अभिनेता सुनिल शेट्टीने प्रिमीयर क्रिकेट लीगला लावली उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 05:24 AM2018-01-15T05:24:15+5:302018-01-16T15:55:42+5:30

स्पोर्टोबडीने आयोजित केलेल्या रोमांचक क्रिकेट स्पर्धा, अँकर प्रिमियर लीगच्या उद्घाटनाची नाणेफेक, बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी यांच्या हस्ते झाल्याने उत्सुकता ...

Actor Sunil Shetty has attended the Premier Cricket League | अभिनेता सुनिल शेट्टीने प्रिमीयर क्रिकेट लीगला लावली उपस्थिती

अभिनेता सुनिल शेट्टीने प्रिमीयर क्रिकेट लीगला लावली उपस्थिती

googlenewsNext
पोर्टोबडीने आयोजित केलेल्या रोमांचक क्रिकेट स्पर्धा, अँकर प्रिमियर लीगच्या उद्घाटनाची नाणेफेक, बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी यांच्या हस्ते झाल्याने उत्सुकता आणि उत्साहाचे रणशिंग फुंकले गेले. लोअर परळच्या पश्चिम रेल्वे क्रिकेट मैदानावर हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला स्पोर्टोबडीचे क्रिएटिव्ह हेड श्री. धनंजय रावल यांच्या प्रमुख उपस्थितीसह स्पर्धेत सहभागी संघ, ग्रेट व्हाईट टस्कर्स आणि फियर्स मुस्टँग्ज या संघांचे कर्णधारही उपस्थित होते.   

या कार्यक्रमानंतर दोन्ही संघांमध्ये रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात रंगला. आपापल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी संघातील खेळाडू व दर्शकांमध्ये उत्साहाची एकच लाट पसरली होती. क्रिकेटविषयीच्या प्रेमापोटी, कुटुंबे व आप्तेष्टांना एकत्र आणण्याच्या हेतुने, स्पोर्टोबडीतर्फे हौशी क्रिकेट खेळाडू व क्रिकेट प्रेमींसाठी अशा स्पर्धांचे वर्षभर आयोजन करण्यात येते. सेलिब्रिटी क्रिकेट लीगमधील मुंबई हिरोज संघाचा खेळाडू सुनिल शेट्टी यांची क्रिकेटविषयी आत्मीयता, आजच्या अटीतटीच्या क्रिकेट सामन्यातही उठून दिसत होती. 
 
स्पोर्टोबडीचे क्रिएटिव्ह हेड श्री. धनंजय रावल यावेळी म्हणाले, “अँकर प्रिमियर लीगच्या, पहिल्या मौसमापासून हौशी क्रिकेटप्रेमींची या सामन्यांना लाभलेली लक्षणीय उपस्थिती पाहणे अत्यंत भारावणारे आहे. आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार व प्रसार करणारे बॉलिवुडमधील सुप्रसिद्ध अभिनेता, सुनिल शेट्टी यांच्या उपस्थितीमुळे क्रिकेट सामन्यांमधील रोमांचकता अजून वाढली. हौशी खेळाडूंमध्ये, क्रियाशील जीवनशैली व खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्याचा स्पोर्टोबडीचा उद्देश आहे. अँकर प्रिमियर लीगसारख्या सामन्यांमुळे, आमचा उद्देश सफल होण्यास मदत होतेच असलेली आपली आवड जोपासण्याचीही संधी त्यांना मिळणार आहे.” मात्र क्रिकेटविषयीच्या प्रेमामुळे, कुटुंबे व मित्रपरिवार एकत्र येण्यासही हातभार लागतो.”

 बॉलिवूड अभिनेते सुनिल शेट्टी म्हणाले, “ क्रिकेटचा एक चाहता म्हणून मी कायम आरोग्यदायी जीवनशैलीचा पुरस्कार केला आहे. स्पोर्टोबडीसारख्या कॉर्पोरेट घटकांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रवेशामुळे, लोकांना फक्त आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्यास किंवा कार्यशील राहण्यास मदत होणार आहे, असे नाही तर खेळाप्रती असलेली आपली आवड जोपासण्याचीही संधी त्यांना मिळणार आहे.”

Web Title: Actor Sunil Shetty has attended the Premier Cricket League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.