Varun Dhawan Birthday: वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अभिनेत्यावर आली होती पोलिसांना फोन करुन बोलवण्याची वेळ, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 08:00 AM2021-04-24T08:00:00+5:302021-12-17T11:30:32+5:30

Varun Dhawan Birthday Special : ‘माय नेम इज खान’ या करण जोहरच्या चित्रपटासाठी त्याने सहायक दिग्दर्शकाचे काम केले.

Actor varun dhawan birthday special unknown story | Varun Dhawan Birthday: वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अभिनेत्यावर आली होती पोलिसांना फोन करुन बोलवण्याची वेळ, कारण...

Varun Dhawan Birthday: वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अभिनेत्यावर आली होती पोलिसांना फोन करुन बोलवण्याची वेळ, कारण...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan)  आपल्या दमदार अभिनयाबरोबरच जबरदस्त डान्स स्टाईलने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.आतापर्यंत वरुण धवनच्या खात्यात अनेक हिट सिनेमा आहेत. वरुण धवन आज आपला 33 वा वाढदिवस (Varun Dhawan Birthday)  साजरा करतो आहे. वरुण धवनच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून घेऊया काही खास गोष्टी. 

वरुण धवनने एका मुलाखतीत सांगितले होते की, एक दिवस तो त्याच्या घरी एकटा होता आणि त्याच्या शेजारच्या भागात अशी घटना घडली की त्याने 100 नंबर डायल करुन पोलिसांना बोलवलं. खरं तर, त्याने शेजारच्या घरात होणाऱ्या घरगुती हिंसाचाराविरोधात आवाज उठवला होता.याबद्दल वरुण म्हणाला होते की, "जेव्हा एखाद्याच्या घरातून आवाज येत असतो तेव्हा आपण विचार करतो की आपण मध्ये पडावे?" मी जिथे राहायचो तिथे  बिल्डिंगचे नाव मला नाही सांगायचं) बाजूच्या घरातून मला आवाज ऐकू आला. त्यावेळी माझ्या घरी कोणी नव्हते. मी पोलिसांना फोन केला. तेव्हा मी 10 किंवा 11 वर्षांचा होतो. '


 नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमध्ये त्याने बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले.२०१० मध्ये आलेल्या ‘माय नेम इज खान’ या करण जोहरच्या चित्रपटासाठी त्याने सहायक दिग्दर्शकाचे काम केले. वरुणने अ‍ॅक्टिंग क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. पण वरूणचा डेब्यू होम प्रॉडक्शनद्वारे न होता त्याने स्वबळावर चित्रपटसृष्टीत नाव कमवावे अशी वरुणचे वडील डेव्हिड धवन यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा वरूणने पूर्ण केली.

वरूणने ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. लेकाच्या या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वडील डेव्हिड धवन कधीही त्याला सेटवर भेटायला गेले नाहीत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाची एकही फ्रेम त्यांनी पाहिली नाही.

सुरूवातीला एक चॉकलेट हिरो अशीच वरूणची ओळख होती. पुढे ‘बदलापूर’ या चित्रपटातून वरूणने या प्रतिमेला छेद दिला. यात ४० वर्षांच्या रघूची भूमिका साकारून वरूणने तो गंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने निभावू शकतो, हे सिद्ध केले. माय नेम इज खान’ या करण जोहरच्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक ते सुपरस्टार अभिनेता हा वरूणचा प्रवास थक्क करणारा आहे. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक ओळख निर्माण केली.

Web Title: Actor varun dhawan birthday special unknown story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.