'मिस्टर लेले'मध्ये वरूण धवनच्या जागी दिसणार हा अभिनेता, लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 04:58 PM2021-01-20T16:58:42+5:302021-01-20T16:59:18+5:30

'मिस्टर लेले' चित्रपटातून आता अभिनेता वरूण धवनने माघार घेतली आहे.

The actor, who will replace Varun Dhawan in 'Mr Lele', will soon start shooting | 'मिस्टर लेले'मध्ये वरूण धवनच्या जागी दिसणार हा अभिनेता, लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

'मिस्टर लेले'मध्ये वरूण धवनच्या जागी दिसणार हा अभिनेता, लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

googlenewsNext

दिग्दर्शक शशांक खेतानने २०१९ मध्ये 'मिस्टर लेले' या चित्रपटाची घोषणा केली होती. यात वरूण धवन मुख्य भूमिकेत दिसणार होता. या चित्रपटाचे पोस्टरदेखील रिलीज केले होते आणि हा चित्रपट १ जानेवारी, २०१२१ला थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र आता वरुणने या सिनेमातून माघार घेतली आहे.

'मिस्टर लेले' चित्रपटातून आता अभिनेता वरूण धवन काम करणार नसल्याचे समजते आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वरूणला या सिनेमाची कथा आवडली नव्हती. त्याने कथेमध्ये थोडा बदल सुचवला होता. मात्र, त्याने सुचवलेल्या कथेवर काम करण्यापूर्वीच करोनाचे संकट आले.

वर्षभराच्या कालावधीत लॉकडाऊनमुळे सिनेमाचे प्रोडक्‍शन थांबले होते. आता निर्मात्यांनी पुन्हा सिनेमाचे काम सुरू करायचे ठरवले आहे. शशांक खेतान यांनी नव्याने स्क्रीप्ट तयार केली आहे आणि वरुणच्या जागेवर विकी कौशलला घेतले आहे.


विकी कौशलला या सिनेमाची मूळ कथा आवडली आहे आणि त्याने गुप्तहेराच्या भूमिकेसाठी होकार दिल्याचे समजते आहे. वरुण धवनने आतापर्यंत अॅक्‍शन हिरोचा रोल केलेला नव्हता. त्याला ही संधी मिळाली होती. पण आता त्याने या भूमिकेसाठी नकार दिला आहे.  


मिस्टर लेले हा एक कॉमेडी चित्रपट आहे आणि यात जबरदस्त ट्विस्ट पहायला मिळणार आहे. यापूर्वी विकी कौशलला कोणत्या कॉमेडी चित्रपटात काम करताना पाहिलेले नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याचा हा वेगळा अंदाज पहायला मिळणार आहे. 'मिस्टर लेले' चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: The actor, who will replace Varun Dhawan in 'Mr Lele', will soon start shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.