बापरे! ही अभिनेत्री अडकली हाँटेड अॅपमध्ये, जाणून घ्या काय आहे ही भानगड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 16:16 IST2020-02-26T16:15:31+5:302020-02-26T16:16:46+5:30
एका हॉण्टेड अॅपमध्ये अडकल्यामुळे ही अभिनेत्री आली आहे चर्चेत

बापरे! ही अभिनेत्री अडकली हाँटेड अॅपमध्ये, जाणून घ्या काय आहे ही भानगड
मिस इंडिया आणि अभिनेत्री अदिती आर्या एका हॉण्टेड अॅपमध्ये अडकल्याचे बोललं जात आहे. याबद्दल सगळीकडे सध्या चर्चा सुरू आहे. खरंतर अदिती आर्याचा झी ५ ओरिजनल्स प्लॅटफॉर्मवर 'अनलॉक - द हॉण्टेड अॅप' नामक वेब फिल्म येत आहे. ही वेब फिल्म १३ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'अनलॉक - द हॉण्टेड अॅप' वेब फिल्ममध्ये अदिती रिद्धी नामक तरूणीच्या भूमिकेत दिसणार आहे. अदिती आर्याच्या व्यतिरिक्त या वेब फिल्ममध्ये हिना खान,कुशाल टंडन आणि रिषभ सिंह हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देवात्म मंडळ यांनी केले आहे.
'अनलॉक - द हॉण्टेड अॅप' या वेब फिल्मबद्दल अदिती आर्या म्हणाली की, मी रिद्धीची भूमिका साकारत आहे आणि या वेब फिल्ममध्ये प्रेक्षकांना हॉररसोबत माझी, हिना खान आणि कुशाल टंडनच्या भूमिकेमध्ये लव्ह ट्रॅंगलसुद्धा पहायला मिळणार आहे. मी या वेब फिल्मसाठी खूप उत्सुक आहे कारण माझ्यासाठी हे एक वेगळेच जॉनर आहे आणि मला ठाऊक आहे की हॉरर जॉनर आवडणारे प्रेक्षक 'अनलॉक - द हॉण्टेड अॅप' खूप आनंद घेतील.
'अनलॉक - द हॉण्टेड अॅप'च्या व्यतिरिक्त अदितीने ओटीटी वेब शो 'तंत्र' आणि 'स्पॉटलाईट २'मध्ये काम केले आहे.
अदितीने तसे साऊथची ब्लॉकबस्टर फिल्म 'सेवेन', 'आई अस एम' आणि 'कुरुक्षेत्र'सारख्या चित्रपटात काम करून साऊथमध्ये खूप नाव कमविले आहे.
तसेच ती '८३' चित्रपटादेखील पहायला मिळणार आहे.