​ ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीमुळे अदिती राव हैदरी बनली ‘मेहरूनिसा’!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 08:54 AM2018-02-02T08:54:06+5:302018-02-02T14:31:01+5:30

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ची अभूतपूर्व यशाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, शाहिद कपूर ...

'This' actress Aditya Rao became 'Mehrunisa'! | ​ ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीमुळे अदिती राव हैदरी बनली ‘मेहरूनिसा’!

​ ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीमुळे अदिती राव हैदरी बनली ‘मेहरूनिसा’!

googlenewsNext
जय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ची अभूतपूर्व यशाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, शाहिद कपूर या सगळ्यांचे भरभरून कौतुक होतेयं. पण रणवीर, दीपिका, शाहिद यांच्यापलीकडे या चित्रपटातील आणखी एक चेहराही अशाच कौतुकास पात्र आहे. होय, हा चेहरा कोण तर अदिती राव हैदरी. अदितीनेही या चित्रपटात स्वत:ला सिद्ध केले आहे. ‘पद्मावत’मध्ये तिने अलाऊद्दीन खिल्जीची पत्नी मेहरूनिसाची भूमिका साकारली आहे. पण ही भूमिका अदितीला कशी मिळाली, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. होय, एका ज्येष्ठ अभिनेत्रीमुळे अदितीला ही भूमिका मिळाली आणि अदितीने या भूमिकेत जीव ओतला.



अदितीच्या नावाची शिफारस करणारी ही ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे, जया बच्चन. होय, जया बच्चन यांनीच या भूमिकेसाठी भन्साळींना अदितीचे नाव सुचवले आणि भन्साळींनीही लगेच या भूमिकेसाठी अदितीला साईन केले. आता जया बच्चन यांनी नेमके अदितीचेच नाव का सुचवावे? असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे.



एका ताज्या मुलाखतीत अदितीला नेमका हाच प्रश्न विचारला गेला. यावर ‘जब बडो का आशीर्वाद मिलता है, तो उस पर सवाल नहीं किया जाता,’असे अदिती म्हणाली. पुढे जया बच्चन यांनी तिचे नाव का सुचवले, याचे कारणही तिने सांगितले.  माझ्या डोळ्यांमुळे जया बच्चन प्रभावित झाल्या होत्या. एका ठिकाणी मी वाचले होते की, माझ्या डोळ्यांत त्यांना सत्य आणि तेज दोन्ही दिसले, असे ती म्हणाली. जया बच्चन यांना खरोखरीच अदितीच्या डोळ्यात प्रामाणिकपणा आणि तेज दिसले असेल तर ते खोटेही नाही.  कारण अदिती किती गुणी आहे, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे.

ALSO READ : या अभिनेत्यासोबत झाले होते अदिती राव हैदरीचा 21 व्या वर्षी लग्न

लवकरच अदिती दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटात दिसणार आहे. मणिरत्नम यांनी आपल्या एका मल्टिस्टारर चित्रपटासाठी अदितीला  साईन केले आहे. हा अदितीचा मणिरत्नम यांच्यासोबतचा दुसरा चित्रपट असणार आहे.  गतवर्षी  मणिरत्नम यांच्या ‘काटरू वेलईदई’ या चित्रपटात ती दिसली होती.

Web Title: 'This' actress Aditya Rao became 'Mehrunisa'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.