म्हणे म्हातारी झालीस...! युजर्सनी उडवली अमिषा पटेलची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 04:29 PM2020-01-19T16:29:33+5:302020-01-19T16:31:45+5:30

आता अमिषा नवा सिनेमा घेऊन येतेय.

actress amisha patel upcoming movie trolled by users | म्हणे म्हातारी झालीस...! युजर्सनी उडवली अमिषा पटेलची खिल्ली

म्हणे म्हातारी झालीस...! युजर्सनी उडवली अमिषा पटेलची खिल्ली

googlenewsNext
ठळक मुद्देअमिषा पटेल याआधी ‘बिग बॉस 13’मध्ये ‘घराची मालकीण’ म्हणून दिसली होती.

‘कहो ना प्यार है’ सिनेमातून अमिषा पटेलने दणक्यात रूपेरी पडद्यावर हृतिकसह एंट्री घेतली होता. हृतिक रोशन आणि अमिषा या दोघांचाही हा पहिला सिनेमा होता. पदार्पणाच्या सिनेमातच दोघांनाही सुपरडुपर यश मिळाले आणि हा सिनेमाही सुपरहिट ठरला होता. सिनेमातून अमिषाच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले. या सिनेमानंतर मात्र अमिषाची जादू फिकी पडली. नाही म्हणायला गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने उत्तम भूमिका केल्यात. पण तरीही अमिषाच्या स्टारडमला ओहोटी लागली तरी लागलीच.  गेल्या काही वर्षांत तर  तिला काम मिळणेही बंद झाले. पण आता अमिषा ‘तौबा तेरा जलवा’ हा नवा सिनेमा घेऊन येतेय. 


या आगामी चित्रपटात अमिषा जतिन खुराणासोबत दिसणार आहे. यात तो गाझियाबादच्या एका युवा टायकूनची भूमिका साकारताना दिसेल.   या सिनेमासाठी अमिषा कमालीची उत्सुक आहे. पण चाहत्यांनी मात्र आत्तापासूनच अमिषाच्या या सिनेमाला ट्रोल करणे सुरु केले आहे. सिनेमाच्या पोस्टरवर सोशल मीडिया युजर्सनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहून तरी हेच वाटते.

तू फार म्हातारी दिसतेय, असे एका युजरने लिहिले आहे. यापेक्षा घरी बसली असती तर चांगले असते, अशी खोचक प्रतिक्रिया अन्य एका युजरने दिले आहे. इतके हेवी मेकअप करूनही फायदा नाही, असेही एका युजरने तिला सुनावले आहे.
अमिषा पटेल याआधी ‘बिग बॉस 13’मध्ये ‘घराची मालकीण’ म्हणून दिसली होती. मात्र अमिषा पटेलचंबिग बॉसच्या घरात येणे रसिकांच्या फारसे पसंतीस पडले नाही. त्यामुळे सोशल  मीडियावर नेटीझन्स अमिषाच्या नावाने फनी मिम्स बनवत तिची खिल्ली उडवत असल्याचे दिसले होते.

Web Title: actress amisha patel upcoming movie trolled by users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.