बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डिलिव्हरीचा व्हिडीओ आला चर्चेत, अशी झाली होती तिची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 15:40 IST2022-05-25T15:35:45+5:302022-05-25T15:40:26+5:30
2016 मध्ये या अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधली होती. ट्विटरद्वारे ही बातमी सांगत तिने तिच्या फॅन्सना धक्का दिला होता.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डिलिव्हरीचा व्हिडीओ आला चर्चेत, अशी झाली होती तिची अवस्था
बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव सध्या आपल्या कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. सोशल मीडियावरील ब्लॉग्सद्वारे अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहते. आता अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नेंन्सीच्या जर्नीनंतर मुलाच्या जन्माशी संबंधित ब्लॉग चाहत्यांशी शेअर केला आहे. यासोबतच अभिनेत्रीने डिलिव्हरी रूमचा फोटोही इंस्टाग्रामवर टाकला आहे.
या फोटोत अमृता राव आणि अनमोल हॉस्पिटलच्या रुममध्ये दिसत आहेत आणि मुलाच्या जन्माच्या वेळी अनमोल अमृताचे लाड करताना दिसत आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत अमृताने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ऑपरेशन थिएटरमध्ये वीरचा जन्म झाला तो क्षण... जेव्हा शब्द नसतात...त्याक्षणीचा हा फोटो...'
अमृताच्या व्लॉगबद्दल सांगायचे तर, यामध्ये तिने चाहत्यांसोबत मुलांची डिलिव्हरीच्या आधीपासून ते नंतरपर्यंतची माहिती शेअर केली आहे. 2016 मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले होते. ट्विटरद्वारे ही बातमी सांगत तिने तिच्या फॅन्सना धक्का दिला होता. लग्न करण्यापूर्वी अमृता आणि अनमोल यांनी जवळजवळ एकमेकांना सात वर्षं डेट केले. पण त्यांनी ही गोष्ट सगळ्यांपासून दडवून ठेवली होती. अमृता आणि अनमोलची भेट अमृताच्या एका मुलाखतीच्या दरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले.
अमृता रावने २००२ मध्ये ‘अब के बरस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यांनतर ती ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’मध्ये दिसली होती. पण अमृताला खरी ओळख शाहिद कपूरसोबतच्या ‘इश्क विश्क’ आणि ‘विवाह’ या चित्रपटातून मिळाली.