ब्रेकअपनंतर अभिनेत्री अनन्या पांडे पूर्णपणे तुटली, मोठा खुलासा करत म्हणाली, 'मी माझा आत्मा गमावला..'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 11:22 AM2024-05-30T11:22:19+5:302024-05-30T11:47:51+5:30

अनन्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

Actress Ananya Pandey breaks down after breakup with Aditya Roy Kapur said i lost my soul | ब्रेकअपनंतर अभिनेत्री अनन्या पांडे पूर्णपणे तुटली, मोठा खुलासा करत म्हणाली, 'मी माझा आत्मा गमावला..'

ब्रेकअपनंतर अभिनेत्री अनन्या पांडे पूर्णपणे तुटली, मोठा खुलासा करत म्हणाली, 'मी माझा आत्मा गमावला..'

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. अनन्या आणि आदित्यला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. पण, गेल्या मार्च महिन्यातच त्यांचं ब्रेकअप झालं. काही दिवसांपुर्वी अनन्याने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. ज्यावरुन दोघांचं ब्रेकअप झाल्याचं कन्फर्म झालं होतं. तर आता यातच अनन्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

अनन्या सध्या या ब्रेकअपमधून सावरत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच ओरी उर्फओरहान अवतारमाणी (Orhan Awatramani)  याने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या मित्रांना "या वीकेंडला काय गमावलं, असं विचारलं. यावर प्रत्येकाने मजेदार उत्तरे दिली. मात्र, लक्ष वेधून घेतले ते अनन्याच्या प्रतिक्रियेने. व्हिडिओमध्ये दिसते की, ओरीने जेव्हाअनन्याला विचारलं 'तिने या आठवड्यात काय गमावलं'  तेव्हा अनन्याने 'मी माझा आत्मा गमावला आहे', असं उत्तर दिलं. तिच्या या उत्तरावरुन ती अजूनही दु:खात असल्याचा अंदाजच चाहते लावत आहेत.

 

 अनन्या पांडे हिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपुर्वीच तिने 'खो गये हम कहाँ' या चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण केलं होतं. तर अनन्याची 'Call Me Bae' ही सीरिज लवकरच  प्रदर्शित होणार आहे. या सीरिजशिवाय अनन्या विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित सायबर-थ्रिलर 'कंट्रोल'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती अक्षय कुमार स्टारर 'शंकारा' या चित्रपटातही दिसणार आहे.

Web Title: Actress Ananya Pandey breaks down after breakup with Aditya Roy Kapur said i lost my soul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.