सुनील शेट्टीच्या या अभिनेत्रीचा लूक बदलला, आजारामुळे सोडलं होतं बॉलिवूड; आता कुठे राहते?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 03:40 PM2023-01-25T15:40:12+5:302023-01-25T15:42:32+5:30
Raageshwari Loomba Life Story: 90च्या दशकातील टॉपच्या हिरोईनमध्ये रागेश्वरीचं नाव घेतलं जातं. पण करिअरच्या शिखरावर असताना ती आजारी पडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक दिवस तिला तिच्या चेहऱ्यात बदल दिसला.
Raageshwari Loomba Life Story: अभिनेत्री आणि गायिका रागेश्वरी लूंबा (Raageshwari Loomba) ने 90 च्या दशकात अनेक बॉलिवूड सिनेमात कामे केली. तिने गायलेली गाणीही लोकांना खूप आवडली. तिच्या काळात रागेश्वरीने सैफ अली खान, गोविंदा, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसारख्या हिरोंसोबत कामे केली. रागेश्वरी केवळ 22 वर्षांची होती तेव्हा तिचा पहिला अल्बम दुल्हनिया रिलीज झाला होता. तिने यातील गाणीही गायली आणि अभियनही केला होता.
90च्या दशकातील टॉपच्या हिरोईनमध्ये रागेश्वरीचं नाव घेतलं जातं. पण करिअरच्या शिखरावर असताना ती आजारी पडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक दिवस तिला तिच्या चेहऱ्यात बदल दिसला. जेव्हा ती डॉक्टरांसोबत बोलली तेव्हा समजलं की, तिला पॅरालिसिस अटॅक आला आहे. त्यामुळे रागेश्वरीचा अर्धा चेहरा आणि चेस्ट सुन्न झालं होतं. तिची स्थिती इतकी बिघडली होती की, ती कुणासोबत बोलूही शकत नव्हती. योग आणि थेरपीच्या मदतीने तिची स्थिती सुधारली. त्यानंतर तिने गाणं सोडलं.
आता कुठे राहते रागेश्वरी
रागेश्वरीने 2012 मध्ये लंडनमधील वकिल सुधांशु स्वरूपसोबत लग्न केलं. आता दोघेही आपल्या मुलांसोबत लंडनमध्ये राहतात. ती नेहमीच तिच्या फॅन्ससाठी इन्स्टावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता रागेश्वरीचा लूक आधीपेक्षा खूप बदलला आहे. आता ती अधिक सुंदर दिसते.
रागेश्वरीच्या सिनेमांबाबत सांगायचं तर तिने 1993 मध्ये गोविंदाच्या आंखेमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यानंतर ती अक्षय कुमार आणि सैफ अली खानच्या 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' मध्ये सैफसोबत दिसली होती. त्याशिवाय रागेश्वरीने 'दिल कितना नादान है', 'मुंबई से आया मेरा दोस्त' सारख्या सिनेमातही कामे केली आहेत.