VIDEO : अंकिता लोखंडेच्या सासरचा थाट, तिच्या बंगल्यापुढे शाहरूख, सलमानचाही बंगलाही फिका पडेल...!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 10:32 AM2022-10-27T10:32:02+5:302022-10-27T10:36:07+5:30
Ankita Lokhande : पती विकी जैन व त्याच्या कुटुंबासोबत अंकिताने दिवाळी साजरी केली. यावेळी अंकिताच्या सासरचा थाट पाहून तुमचेही डोळे दिपतील...
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सोशल मीडियावर किती अॅक्टिव्ह आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. सध्या अंकिता दिवाळी सेलिब्रेशनमध्ये मग्न आहे. लग्नानंतरची पहिली दिवाळी ती साजरी करतेय. पती विकी जैन व त्याच्या कुटुंबासोबत अंकिताने दिवाळी साजरी केली. यावेळी अंकिताच्या सासरचा थाट पाहून तुमचेही डोळे दिपतील. अंकिताने सासरच्या घरच्या दिवाळी सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अंकिताच्या सासरच्या घराची झलक पाहायला मिळते.
अंकिताच्या सासरचं घर म्हणजे जणू महाल आहे. अख्खा बंगला फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आला आहे. हे घर इतकं अलिशान आहे की, त्यापुढे सलमान, शाहरूखचं घरही फिकं वाटावं. व्हिडीओत अख्ख जैन कुटुंब दिवाळी साजरी करताना दिसतंय. सध्या अंकिताच्या या घराचीच चर्चा आहे.
अंकिता व विकी यांचं मुंबईतही इतकंच अलिशान घर आहे. याची झलकही अंकिताने दाखवली होती. लग्नानंतर विकी व अंकिता या घरात शिफ्ट झालेत. विकी आणि अंकिताने लग्नाआधी दोन वर्षांपूर्वी मुंबईत नवीन घर घेतलं होतं. पण कोरोना महामारीमुळे काम पूर्ण न झाल्यामुळे ते त्यांच्या घरी शिफ्ट होऊ शकले नव्हते. आता मात्र ती व विकी या नव्या घरात शिफ्ट झाले आहेत. या नव्या घरात गृहप्रवेश झाल्यानंतर अंकिताने आपल्या सेलिब्रेटी मित्र-मैत्रिणींसाठी एक खास पार्टी ठेवली होती. यामध्ये राहुल वैद्य, दिशा परमार,अली गोनी, पवित्र रिश्ता मालिकेतील सहकलाकार यांच्यासोबत अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. या सर्व सेलेब्रेटींनी आपल्या सोशल मीडियावर अंकिताच्या नव्या घराचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते.
अंकिता व विकी जैन यांनी गतवर्षी 14 डिसेंबरला लग्नगाठ बांधली होती. या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. अंकिताचा पती विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे. अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये त्याचा बिझनेस आहे. विकी हा मुळचा छत्तीसगडचा आहे. अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने एमबीए केलं आणि यानंतर वडिलोपार्जित व्यवसायात त्याने स्वत:ला झोकून दिलं. विकी एका कोळसा व्यापा-याचा मुलगा आहे. त्याचे आई-वडील विनोद कुमार जैन आणि रंजना जैन दोघेही व्यवसाय करतात. लाकडी कोळसा, पीआयटी कोळसा आणि बिटुमिनस कोळसा असा त्यांचा व्यवसाय आहे.