Anushka Sharma Second Pregnancy: येणार गं..कुणीतरी येणार गं..! अनुष्का शर्मा-विराट कोहली दुसऱ्यांदा होणार आई-बाबा?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 12:31 PM2023-09-30T12:31:31+5:302023-09-30T12:31:52+5:30

Anushka Sharma Second Pregnancy: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत.अभिनेत्री प्रेग्नेंट आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे बोलले जात आहे.

Actress Anushka Sharma- Cricketar Virat Kohli will become parents for the second time? | Anushka Sharma Second Pregnancy: येणार गं..कुणीतरी येणार गं..! अनुष्का शर्मा-विराट कोहली दुसऱ्यांदा होणार आई-बाबा?

Anushka Sharma Second Pregnancy: येणार गं..कुणीतरी येणार गं..! अनुष्का शर्मा-विराट कोहली दुसऱ्यांदा होणार आई-बाबा?

googlenewsNext

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma ) आणि क्रिकेटर विराट कोहली(Virat Kohli)बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच त्यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. विराट कोहली आणि अनुष्का दुसऱ्यांदा आई-वडील होणार आहेत. अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे कपल लवकरच त्यांच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर करणार आहे. मात्र सध्या त्यांना ही गोष्ट जगासमोर आणायची नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराटला मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर पापाराझींनी स्पॉट केले होते, परंतु दोघांनीही त्यांना फोटो लीक न करण्याची विनंती केली होती.

अनुष्का-विराटला आहे २ वर्षांची मुलगी

याबाबत लवकरच घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच कारणामुळे अनुष्का बऱ्याच दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाही. अंबानींच्या गणेश चतुर्थीच्या पार्टीतही हे जोडपे गायब होते. या दोघांना २ वर्षांची मुलगी वामिका आहे. या जोडप्याने अद्याप आपल्या मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. एका मुलाखतीत विराटने सांगितले होते की, त्याने आणि अनुष्काने ठरवले आहे की जोपर्यंत तिला हे समजत नाही तोपर्यंत ते त्यांच्या मुलीला प्रसारमाध्यमांसमोर आणणार नाहीत.

Web Title: Actress Anushka Sharma- Cricketar Virat Kohli will become parents for the second time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.