अभिनेत्री बनल्या ‘जासूस’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 10:00 AM2018-05-19T10:00:01+5:302018-05-19T15:34:17+5:30
अभिनेत्री केवळ इमोशनल आणि रोमान्सशी संबंधितच भूमिका साकारू शकतात, हा समज अभिनेत्रींनी वेळोवेळी पुसण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही ...
द हीरो : लव स्टोरी आॅफ द स्पाय
चित्रपटाच्या नावातच ‘स्पाय’ हा शब्द असल्याने त्यात जासूसची भूमिका हमखास असेल याचा अंदाज प्रेक्षकांना अगोदरच आला होता. परंतु ही भूमिका अभिनेता साकारणार की अभिनेत्री? याविषयी मात्र प्रेक्षक अनभिज्ञ होते. या चित्रपटात अभिनेत्री प्रीती झिंटाने एका जासूसची भूमिका साकारली होती. तर धडाकेबाज अभिनेता सनी देओल सैनिकाच्या भूमिकेत बघावयास मिळाला. चित्रपटात प्रीतीला पाकिस्तानात हेरगिरी करण्यास पाठविले जाते. तिने अतिशय उत्तमरीत्या या भूमिकेला न्याय दिला आहे.
एक था टायगर
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरस्टार सलमान खानच्या ‘एक था टायगर’ या चित्रपटात अभिनेत्री कॅटरिना कैफने एका पाकिस्तानी जासूसची भूमिका साकारली होती. जबरदस्त अॅक्शन अंदाजात असलेल्या कॅटचा हा अवतार प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. कॅटला चित्रपटात इंडियन रॉ एजंट सलमान खानशी प्रेम होते. त्याबाबतचाच थरार प्रेक्षकांना बघावयास मिळतो.
कहानी
२०१२ मध्येच आणखी एका महिला जासूसवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याचे नाव ‘कहानी’ असे होते. सुजॉय घोषच्या या थ्रिलर चित्रपटात अभिनेत्री विद्या बालनने जासूसची भूमिका साकारली होती. गर्भवती असतानाही ती तिच्या पतीचा शोध घेण्यास बाहेर पडते. वास्तविक ती एका सीक्रेट आॅपरेशनवर असते.
एजंट विनोद
हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर समाधानकारक कमाई करू शकला, मात्र करिनाचा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावला. चित्रपटात करिना एक आयएसआय एजंट असते. अतिशय थ्रिलर असलेल्या या चित्रपटात करिनाही अॅक्शन अवतारात दिसून आली. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर ४३ कोटी रुपयांची कमाई केली होती.
डी-डे
२०१३ मध्ये आलेल्या या चित्रपटात अभिनेत्री हुमा कुरेशी ‘रॉ’च्या मिशनवर असते. हुमाचा हा पहिलाच अॅक्शनपट असल्याने तिने तिच्या भूमिकेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. हुमाचा अॅक्शन अवतार प्रेक्षकांनाही चांगलाच भावला. या चित्रपटात तिच्यासोबत ऋषी कपूर, अर्जुन रामपाल, इरफान खान आणि श्रुती हासन यांच्या मुख्य भूमिका आहेत.
फोर्स-२
सोनाक्षीने बºयाच चित्रपटांमध्ये अॅक्शन भूमिका साकारल्या असून, या चित्रपटातही ती काहीशा अशाच अंदाजात होती. चित्रपटात तिने एका भारतीय इंटेलिजन्स एजंटची भूमिका साकारली होती. चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत बघावयास मिळाला. सोनाक्षीचा अॅक्शन अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.
नाम शबाना
अभिनेत्री तापसी पन्नू स्टारर ‘नाम शबाना’ हा चित्रपट एका भारतीय एजंटच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात तापसी मुख्य भूमिका साकारताना बघावयास मिळाली. तापसीचा हा चित्रपट २०१५ मध्ये आलेल्या ‘बेबी’ या हिट चित्रपटाचा प्रीक्वल होता. चित्रपटात तापसी तुफान अॅक्शन अंदाजात बघावयास मिळाली.