मेलर्बनमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकरला करण्यात आलं सन्मानित, अभिनेत्री म्हणाली-माझ्या कामावर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 07:51 PM2023-08-11T19:51:57+5:302023-08-11T20:04:48+5:30

'दम लगा के हैश्शा' या आपल्या पहिल्याच सिनेमातून तिने प्रेक्षकांवर छाप पाडली.

Actress Bhumi Pednekar honored in Melbourne | मेलर्बनमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकरला करण्यात आलं सन्मानित, अभिनेत्री म्हणाली-माझ्या कामावर...

मेलर्बनमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकरला करण्यात आलं सन्मानित, अभिनेत्री म्हणाली-माझ्या कामावर...

googlenewsNext

अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) बॉलिवूडमध्ये स्वत:च्या मेहनतीने आणि टॅलेंटच्या जोरावर ओळख बनवली आहे. 'दम लगा के हैश्शा' या आपल्या पहिल्याच सिनेमातून तिने प्रेक्षकांवर छाप पाडली. सहज अभिनय आणि उत्तम स्क्रिप्टवर तिने काम केलं आहे. भूमीला नुकतेच इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नतर्फे (आयएफएफएम) डिसरप्टर ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर भूमी म्हणाली, “आयएफएफएममध्ये 'डिसरप्टर ऑफ द इयर’ हा पुरस्कार स्वीकारताना मी भारावून गेल्यासारखे वाटत आहे. हा पुरस्कार माझ्या कामावर शिक्कामोर्तब करणारा आहे. मी आजवर केलेल्या प्रत्येक सिनेमाचा मला अभिमान वाटतोच पण 'बधाई दो'चा मला जास्त अभिमान वाटतो. 


'दम लगाके हईशा' या चित्रपटात भूमीने तिच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी १५ किलो वजन वाढवले ​​होते. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर भूमीने मागे वळून पाहिले नाही. मुंबईच्या आर्य विद्या मंदिरातून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केलेल्या भूमीने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा नेहमीच निर्धार केला होता. सुरुवातीला तिने यशराज बॅनरमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. भूमीने तिच्या करिअरची सुरुवात आयुष्मान खुरानासोबत यशराज बॅनरच्या दम लगाके हईशा या चित्रपटातून केली होती.  यानंतर ती 'टॉयलेट एक प्रेम कथा', 'शुभ मंगल ‍‍यादा सावधान', 'लस्ट स्टोरीज' यासह अनेक चित्रपटांमध्ये दिसली. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर भूमी लवकरच अर्जुन कपूरसोबत 'द लेडी किलर' या चित्रपटात दिसणार आहे.
 

Web Title: Actress Bhumi Pednekar honored in Melbourne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.