हम आपके हैं कौन: सेटवर घडला होता मोठा अपघात; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या केसांना लागली होती आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 18:54 IST2023-05-02T18:54:16+5:302023-05-02T18:54:52+5:30
Hum aapke hain kaun: या सिनेमातील 'धिकताना धिकताना' या गाण्यादरम्यान अभिनेत्रीच्या केसांना आग लागली होती.

हम आपके हैं कौन: सेटवर घडला होता मोठा अपघात; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या केसांना लागली होती आग
बॉलिवूडमध्ये असे काही सिनेमे आहेत जे आजही एव्हरग्रीन म्हणून ओळखले जातात. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे हम आपके हैं कोन. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. सलमान खान, माधुरी दिक्षित, रेणुका शहाणे अशी दिग्गज कलाकार मंडळी या सिनेमात झळकली होती. विशेष म्हणजे या सिनेमाच्या सेटवरील अनेक किस्से चाहत्यांमध्ये चर्चेत येत असतात. यामध्येच सध्या एका अभिनेत्रीचा किस्सा चर्चिला जात आहे. या अभिनेत्रीच्या केसांना चक्क आग लागली होती.
या सिनेमातील 'धिकताना धिकताना' हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं होतं. याच गाण्यादरम्यान, अभिनेत्री बिंदू यांच्या केसांना आग लागली होती. ज्यामुळे सेटवर एकच गोंधळ उडाला होता. रेणुका शहाणे यांनी एका मुलाखतीत याविषयी सांगितलं होतं.
नेमका काय घडला प्रकार
या गाण्यात एका ठराविक ठिकाणी सगळे कलाकार हातात फुलबाजी घेऊन नाचत असतात. याचवेळी त्यातील एक फूलबाजी बिंदू यांच्या विगला लागली आणि त्यांच्या विगने पेट घेतला होता. "त्या गाण्यावेळी बिंदू जींच्या विगला आग लागली होती. धिकताना धिकताना गाण्यात मोहनिश परत येतात आणि दिवाळी असते. सगळे आतिशबाजी करत असतात. आम्ही सगळे हातात फुलबाजी घेऊन ती गोल गोल फिरवत होतो. तर बिंदू यांनी उत्साहाच्या भरात ती फुलबाजी इतकी जोरात फिरवली की त्यांच्या स्वत:च्याच विगला आग लागली".
दरम्यान, १९९४ साली हम आपके हैं कौन हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला २९ वर्ष पूर्ण झाली असून आजही तो अनेकांचा लोकप्रिय आहे. या सिनेमात एकूण 13 दमदार गाणी आहेत