अभिनेत्री चित्राच्या आत्महत्या प्रकरणाला लागलं वेगळं वळण, तेलगू अभिनेता तिला करत होता ब्लॅकमेल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 08:41 PM2020-12-19T20:41:02+5:302020-12-19T20:41:47+5:30
९ डिसेंबरला चित्रा हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळली होती.
छोट्या पडद्यावरील तमीळ अभिनेत्री वीजे चित्राने जगाचा निरोप घेतला आहे. तिचे पार्थिव ९ डिसेंबर रोजी चेन्नईतील एका हॉटेलमध्ये आढळला. त्यानंतर तिच्या मृत्यूचा तपास पोलीस करत आहे. वीजे चित्राच्या मृत्यू प्रकरणाला दररोज वेगळे वळण मिळत आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूच्या आरोपाखाली तिच्या नवऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वीजे चित्राचे तेलगू सिनेमातील एका अभिनेत्यासोबत अफेअर होते आणि त्याच्याकडे तिचा एक खासगी व्हिडीओदेखील होता. अभिनेता चित्राला तिचा व्हिडीओ तिचा नवरा हेमंत रवीला दाखवण्याची धमकी देत होता. ही माहिती अभिनेत्रीच्या खास फ्रेंडनी मीडियाशी बोलताना सांगितली. सोबतच हेदेखील सांगितले की चित्रा तिच्या बॉयफ्रेंडमुळे खूप त्रस्त होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, चित्राला धमकी देणारा तिचा तेलगू अभिनेता बॉयफ्रेंडला राजकीय पार्श्वभूमी आहे. त्याने अभिनेत्रीचा खासगी व्हिडीओ बनवून धमकी देत होता जर तिने त्याचे ऐकले नाही तर तो चित्राच्या पतीला तिचा खासगी व्हिडीओ दाखवेन. इतकेच नाही तर तो तेलगू अभिनेत्याने खासगी व्हिडीओच्या माध्यमातून चित्राला वारंवार राजकीय पक्षात सहभागी होण्यासाठी दबाव टाकत होता.
वृत्तानुसार चित्रा बॉयफ्रेंडच्या दबावाखाली त्याच्या पक्षात नवीन वर्षी प्रवेश करणार होती. पोलीस या प्रकरणाची सखोल तपासणी करत आहे. २८ वर्षीय वीजे चित्राने ९ डिसेंबरला चेन्नईतील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळली होती. तमीळनाडू पोलिसांनी अभिनेत्रीच्या नवऱ्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
चित्राच्या आई विजयाने आरोप केला आहे की, आपली मुलगी कधीही फाशी लावून घेऊन शकत नाही, परंतु हेमंतने तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले.
चित्रा आणि हेमंतना यांनी 2 महिन्यांपूर्वीच आपल्या लग्नासाठी रजिस्ट्रेशन केले होते. यानंतर, जानेवारीत पारंपरिक पद्धतीने लग्न आणि रिसेप्शन देण्याचा प्लान होता. ईव्हीपी फिल्म सिटीमध्ये शुटींग आटोपून चित्रा मध्यरात्री 2.30 वाजता आपल्या हॉटेलमधील रुममध्ये आल्या होता. हॉटेलमध्ये भावी पती हेमंत यांच्यासमवेत त्या राहात होत्या. हेमंत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, शुटींगवरुन परतल्यानंतर चित्राने अंघोळीसाठी जात असल्याचं सांगितल. मात्र, खूप वेळानंतरही त्या बाथरुममधून बाहेर येत नसल्याचे लक्षात येताच हेमंत यांनी दरवाजा ठोठावला. तरीही, चित्राकडून काहीच प्रतिक्रिया न मिळाल्याने हेमंत यांनी हॉटेल स्टाफला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर, डुप्लीकेट चावीने हॉटेल रुममधील तो दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी, सिलींगला चित्राचा मृतदेह लटकलेला आढळून आला. चित्राचा पती हेमंत पोलीस कोठडीत आहे.