‘त्या’ अभिनेत्रीने मासिक पाळी असतानाही भरपावसात रडत-रडत केले शूटिंग : अक्षयकुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 04:45 PM2018-01-14T16:45:20+5:302018-01-14T22:15:20+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार सध्या त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तो या चित्रपटात अभिनेत्री सोनम कपूर आणि ...
ब लिवूडचा खिलाडी अक्षयकुमार सध्या त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तो या चित्रपटात अभिनेत्री सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्यासोबत बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट मुरुगनाथम यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी ग्रामीण दुर्गम भागातील महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले. अक्षयचा हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. नुकतेच अक्षयने एका प्रमोशन इव्हेंटमध्ये मासिक पाळीविषयी अनेक खुलासे केले. त्याबाबतचा एक किस्साही त्याने यावेळी सांगितला.
अक्षयने म्हटले की, मी जेव्हा २० वर्षांचा होतो तेव्हा पहिल्यांदा मासिक पाळीविषयी ऐकले होते. पुढे बोलताना अक्षयने म्हटले की, मी या गंभीर मुद्द्यावर मुलगा आरवसोबतही बºयाचदा चर्चा केली आहे. खरं तर मासिक पाळीविषयी लोकांच्या धारणा बदलण्याची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वीच माझ्या वाचण्यात आले होते की, एका शाळकरी अल्पवयीन मुलीने तिच्या मासिक पाळीमुळे आत्महत्या केली. कारण शाळेत असताना तिच्या स्कर्टला रक्ताचा डाग लागला होता, त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी तिची खिल्ली उडविली. याच कारणामुळे तिने स्वत:ची जीवनयात्रा संपविली.
अक्षयने म्हटले की, ही केवळ आपल्या देशाची समस्या नाही तर, घानाविषयी सांगायचे झाल्यास त्याठिकाणी एक नदी आहे. या नदीला ‘रिव्हर आॅफ गॉडेस’ या नावाने पुजले जाते. मासिक पाळीदरम्यान महिलांना ती नदी ओलांडण्यास बंदी आहे. यावेळी अक्षयने याच्याशी संबंधित एक किस्सा सांगितला. त्याने म्हटले की, करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी त्याठिकाणी एका चित्रपटाची शूटिंग करीत होतो. त्यावेळी माझ्या अपोझिट एक १४ वर्षांची अभिनेत्री होती.
त्या अभिनेत्रीला सेटवरच पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती. त्या अभिनेत्रीच्या आईने निर्मात्याकडे मुलीला सुटी द्यावी म्हणून विनंती केली होती. परंतु त्या निर्मात्याने त्यांचे काहीही ऐकले नव्हते. त्या मुलीकडून पावसात एक सीक्वेंस शूट करायचा होता. अशात रडत-रडत त्या अभिनेत्रीने ती शूटिंग पूर्ण केली होती. अक्षयने म्हटले की, त्यावेळी शूटिंग थांबविण्याइतपत माझ्यात ताकद नव्हती. कदाचित ती घटना आज घडली असती तर मी नक्कीच शूटिंग थांबवू शकलो असतो.