साऊथची अभिनेत्री डिंपल आणि त्याच्या होणाऱ्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार, IPS अधिकाऱ्याच्या गाडीला मारली टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 02:54 PM2023-05-23T14:54:48+5:302023-05-23T14:56:19+5:30
या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री डिंपलने ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
साऊथ अभिनेत्री डिंपल हयाती ही टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. डिंपल हयातीची मोठी फॅन फॉलोइंग आहे. . ही अभिनेत्री केवळ तिच्या सौंदर्यासाठी सोबतच, तिच्या चित्रपटांसाठी देखील ओळखली जाते. अलीकडेच डिंपल एका मोठ्या अडचणीत सापडली आहे. तिच्यावर आयपीएस अधिकाऱ्याच्या गाडीचं नुकसान केल्याचा आरोप होता, यावर आता अभिनेत्रीची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री डिंपल हयाती आणि तिचा होणारा नवरा व्हिक्टर डेव्हिडवर काही आरोप करण्यात आले होते की, अभिनेत्री आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर आयपीएस अधिकाऱ्याच्या गाडीचे नुकसान केले होते, त्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिंपल आणि आयपीएस अधिकारी एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. या प्रकरणानंतर अभिनेत्री कायद्याच्या जाळ्यात अडकली असून आता डिंपलने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
या प्रकरणाला अनेक दिवस झाले आहेत, मात्र या प्रकरणात डिंपल हयाती आणि त्याच्या मित्रावर आरोप करणाऱ्या अधिकाऱ्याच्या ड्रायव्हवर विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ड्रायव्हरने आपल्या तक्रारीत डिंपल आणि तिच्या मैत्रिणींवर नवा आरोप केला असून, त्यांनी जाणीवपूर्वक आयपीएसच्या गाडीला धडक दिली होती. चालकाच्या तक्रारीवरून डिंपल आणि तिच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Using power doesn’t stop any mistake . 😂
— Dimple Hayathi (@DimpleHayathi) May 23, 2023
Misuse of power doesn’t hide mistakes .. 😂 . #satyamevajayathe
— Dimple Hayathi (@DimpleHayathi) May 23, 2023
अभिनेत्रीच्या होणाऱ्या पतीने चुकून आयपीएस राहुल यांच्या कारला धडक दिली, त्यानंतर ड्रायव्हर चेतन कुमारने याबाबत बोलला, त्यानंतर डिंपलने रागाने कारला लाथ मारली. या घटनेने चेतन कुमारने जुबली हिल्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर डिंपल आणि व्हिक्टर डेव्हिडला पोलिस ठाण्यात बोलावून नोटीसही बजावण्यात आली.