Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिनला दिलासा; 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 12:15 PM2022-09-26T12:15:44+5:302022-09-26T12:22:01+5:30
Jacqueline Fernandez: सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 ऑक्टोबरला होणार आहे.
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सुकेश चंद्रशेखरसंबंधी 200 कोटी रूपयांच्या फसवणुकीच्या केसमध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला पतियाळा हाऊस कोर्टाने दिलासा दिलायं. जॅकलिनला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जॅकलिनच्या वकिलाच्या विनंतीवरून न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जामिनावर अंतरिम जामीन मंजूर केला. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलीनविरुद्ध आरोपपत्र सादर केल्यानंतर तिला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
याआधी दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने जॅकलिनची दीर्घकाळ चौकशी केली होती. ही चौकशी जवळपास 15 तास चालली, ज्यामध्ये जॅकलिनला अनेक गंभीर प्रश्नांनाचा सामना करावा लागला होतो. या सगळ्या दरम्यान, ईडीने आपले आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीन देखील आरोपी असल्याचे म्हटलं आहे. अनेक साक्षीदार आणि पुरावे आधार बनवण्यात आले आहेत.
#UPDATE | Additional Sessions Judge Shailender Malik sought a response from the ED on the bail plea. Till then her regular bail is pending before the court... On the request of Jacqueline's lawyer, the court granted interim bail to Jacqueline on a bail bond of Rs 50,000.
— ANI (@ANI) September 26, 2022
जॅकलिन फर्नांडिसने ठग सुकेशकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचे कबूल केले होते. या प्रकरणात जॅकलिनशिवाय नोहा फतेही आणि निक्की तांबोळीसह आणखी अभिनेत्रींचा समावेश आहे. दोन्ही अभिनेत्रींचीही चौकशी करण्यात आली आहे. 200 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्ली तुरुंगात बंद आहे आणि त्याच्यावर 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.