जान्हवी कपूरचा 'उलझ' ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार, ॲक्शनपॅक थ्रिलर चित्रपटाची रिलीज डेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 10:33 AM2024-07-11T10:33:57+5:302024-07-11T10:34:55+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Actress Janhvi Kapoor posted two new posters of 'Ulajh ', which will release on August 2 | जान्हवी कपूरचा 'उलझ' ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार, ॲक्शनपॅक थ्रिलर चित्रपटाची रिलीज डेट समोर

जान्हवी कपूरचा 'उलझ' ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार, ॲक्शनपॅक थ्रिलर चित्रपटाची रिलीज डेट समोर

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता एका दमदार भूमिकेत जान्हवी कपूर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  जान्हवीच्या बहुचर्चित असलेल्या 'उलझ' सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. अखेर 'उलझ'ला मुहुर्त मिळाला असून लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

जान्हवीने पोस्ट शेअर करत या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. येत्या २ ऑगस्ट २०२४ रोजी 'उलझ' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपुर्वीच सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जो पाहून चाहते हे ट्रेलरची वाट पाहत आहेत. गेल्या वर्षभरापासून जान्हवी कपूर 'उलझ' चित्रपटाच्या चित्रीकरणासंदर्भात अपडेट देत आली आहे. चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती. 

देशभक्तीने प्रेरित 'उलझ'ची कथा खुपच खास आहे. जान्हवीचा हा चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर भारतीय वन सेवा अधिकारीच्या (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर -IFS) भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा देशभक्तीवर आधारित असून तरुण मुत्सद्दी सुहानाच्या (जान्हवी कपूर) भोवती फिरणारी कथा आहे. 'उलझ' चित्रपटात सुहाना देश आणि तिच्या विरोधात रचलेले कट उधळवताना पाहायला मिळणार आहे. 

 जान्हवी कपूर सिनेमात  प्रमुख भूमिकेत झळकत आहे. तिचा ॲक्शनपॅक अंदाज आणि जबरदस्त अभिनय पाहायला मिळतोय. जान्हवी कपूरसोबत या सिनेमात गुलशन देवियाह, राजेश तेलंग, रोशन मॅथ्यू, आदिल हुसेन हे लोकप्रिय कलाकार झळकत आहेत. सुधांशु सरिया यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. यासोबतच जान्हवी 'देवरा' सिनेमाच्या माध्यमातून जान्हवी साऊथ इंडस्ट्री सुद्धा गाजवायला सज्ज आहे.  
 

Web Title: Actress Janhvi Kapoor posted two new posters of 'Ulajh ', which will release on August 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.