मानसिक आजाराचा सामना करणाऱ्या व्यक्तीशी काजोलचा गैरव्यवहार, पोस्ट व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 11:47 AM2024-04-29T11:47:48+5:302024-04-29T11:49:07+5:30
अभिनेत्री काजोलने एका रेस्टॉरंटमध्ये मानसिक आजाराचा सामना करणाऱ्या रुग्णाला वाईट वागणूक दिल्याची घटना उघडकीस आलीय. नेमकं प्रकरण काय? (kajol)
अभिनेत्री काजोल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. काजोल गेली अनेक वर्ष बॉलिवूडच्या विविध सिनेमांमधून तिच्या अभिनयाची छाप पाडतोय. काजोल वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे चर्चेत असते. काजोल नुकतीच एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने मानसिक आजाराचा सामना करणाऱ्या एका व्यक्तीसोबत दुर्वतन केल्याची घटना घडलीय. त्या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट करुन सविस्तर खुलासा केलाय. काय आहे नेमकं प्रकरण?
ही घटना उघड करणारी एक पोस्ट रेडिट या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालीय. या पोस्टमध्ये लिहिलंय की, "माझं माझ्या भावावर खूप प्रेम आहे. तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे आणि त्याच्या आयुष्यातील हा कठीण काळ आहे. काही लोकांच्या मदतीने त्याला जुहू येथील एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळाली आणि त्यामुळे तो खूप खूश होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याची नोकरी सुरू आहे आणि त्यामुळे तो खूप खूश आहे."
Tea on nasty kajol
byu/isabellapintoisback inBollyBlindsNGossip
या पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की, "माझा भाऊ काजोलचा मोठा चाहता आहे. तो अभिनेत्रीचे दिलवाले आणि माय नेम इज खान असे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहतो. काल काजोल तिच्या काही मैत्रिणींसोबत माझा भाऊ काम करत असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आली होती. माझ्या भावाने तिला व्यवस्थित सर्व्हिस देऊन अभिनेत्रीच्या रात्रीच्या जेवणाची चोख व्यवस्था केली. तो शेवटी बिल घेऊन काजोलकडे गेला. माझ्या भावाला काजोलला शुभेच्छा द्यायच्या होत्या. याशिवाय तो तिचा चाहता आहे, हे त्याला सांगायचं होतं. माझा भाऊ इतका आनंदी होता की, तो तिच्यासमोर रडू लागला. पण काजोल म्हणाली, 'झालं का? आता नाटक बंद करा आणि बिल द्या आम्हाला.' नंतर काजोलने भावाबद्दल मॅनेजरकडे तक्रारही केली. या घटनेमुळे भाऊ आता कोणाशीही बोलताना संकोच करतो." ही घटना 2022 ची असली तरी ती Reddit वर आता खूप व्हायरल होत आहे. काजोलच्या अशा वागण्याबद्दल लोकं तिच्यावर टीका करत आहेत.