अभिनेत्री काजोलने विकला पवईतील आलिशान फ्लॅट, मराठमोळ्या दाम्पत्यासोबत झाली कोटींची डील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:55 IST2025-03-26T13:55:01+5:302025-03-26T13:55:41+5:30
काजोलने किती कोटींना विकला आलिशान फ्लॅट?

अभिनेत्री काजोलने विकला पवईतील आलिशान फ्लॅट, मराठमोळ्या दाम्पत्यासोबत झाली कोटींची डील
गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी फ्लॅट्स खरेदी-विक्रीचे व्यवहार केले आहेत. यातून अनेकांना कोटींचा नफाही झाला आहे. अक्षय कुमार, जॉन अब्राहम, जान्हवी कपूरसह काही सेलिब्रिटींनंतर आता अभिनेत्री काजोलनेही (Kajol) तिचा मुंबईतील पवई इथला फ्लॅट विकला आहे. याची डील कोटींच्या घरात आहे. शिवाय हा फ्लॅट एका मराठी दाम्पत्याने खरेदी केला आहे.
अभिनेत्री काजोलचा पवई येथे २१ मजल्यावर आलिशान फ्लॅट होता. ७६२ चौरस फुटावर पसरलेला हा फ्लॅट आता तिने ३.१ कोटींना विकला आहे. 'झॅप्की'च्या रिपोर्टनुसार, रजनीश राणे आणि वृषाली राणे या जोडप्याने हा फ्लॅट खरेदी केला आहे. पवईच्या हीरानंदानी गार्डनमधील अटलांटिस को.हाऊसिंग सारख्या उच्चभ्रू सोसायटीत हा फ्लॅट आहे. २० मार्च रोजी ही कोट्यवधींची डील झाली.
काजोलने याच महिन्यात गोरेगाव पश्चिम मध्ये एक कमर्शियल स्पेस खरेदी केली होती. यासाठी तिने २८.७८ कोटी रुपये मोजले होते. ४३६५ चौरस फुट इतका च्याचा एरिया आहे. याशिवाय २०२३ मध्ये तिने ओशिवरा मध्येही ऑफिस स्पेसमध्ये गुंतवणूक केली होती.
काजोल आणि पती अजय देवगणची कोट्यवधींची संपत्ती आहे. काजोल एकटी २४० कोटींची मालकीण आहे. मुंबईत अनेक आलिशान घरं तिच्या नावावर आहेत. दोघंही मुंबईतील 'शिवशक्ती' या अपार्टमेंटमध्ये राहतात. अजय देवगणची नेटवर्थ ५३४ कोटी इतकी आहे. त्यांच्याजवळ अनेक महागड्या गाड्यांचंही कलेक्शन आहे.