करीना कपूर हॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली- "माझ्या वॅनिटीमध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:01 IST2025-04-02T14:59:54+5:302025-04-02T15:01:16+5:30

करीना कपूरने तिच्या हॉलिवूड एन्ट्रीविषयी मोजक्या शब्दात उत्तर दिलंय. काय म्हणाली अभिनेत्री? (kareena kapoor khan)

actress Kareena Kapoor khan work in Hollywood after singham again movie | करीना कपूर हॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली- "माझ्या वॅनिटीमध्ये..."

करीना कपूर हॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली- "माझ्या वॅनिटीमध्ये..."

बॉलिवूडची बेबो अशी ओळख असणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान. करीना (kareena kapoor khan) गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. विविध सिनेमांमधून करीना प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. करीनाने विविध भूमिकांमधून बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नाव मिळवलं. अशातच करीना आता थेट हॉलिवूडमध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार, अशी चर्चा आहे. त्यामुळे करीनाच्या चाहत्यांम्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हॉलिवूड पदार्पणाबद्दल करीना काय म्हणाली? जाणून घ्या

करीना हॉलिवूडमध्ये घेणार एन्ट्री

करीना कपूर खान अलीकडेच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी करीनाला हॉलिवूड डेब्यूबद्दल प्रश्न विचारण्यात आला. करीनाने हॉलिवूड पदार्पणाच्या प्रश्नावर जास्त काही वक्तव्य केलं नाही. याविषयी ती योग्य विचार करुन निर्णय घेणार आहे, असं तिच्या हावभावांवरुन सर्वांना जाणवलं. याशिवाय करीनाचा गंमतीशीर अंदाज सर्वांना बघायला मिळाला. "माझ्या वॅनिटी वॅनमध्ये जे घडतं, ते तिथेच राहतं. बाहेर येत नाही," अशा वाक्यात करीनाने उत्तर देऊन तिचा हजरजबाबीपण दाखवला.


करीनाचं वर्कफ्रंट

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २०२४ मध्ये करीनाचा 'सिंघम अगेन' सिनेमात दिसली. या सिनेमात करीनाने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली. दिवाळीत रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. करीना आता लवकरच मेघना गुलजार यांच्या 'दायरा' सिनेमात झळकणार आहे. याशिवाय 'वीरे दे वेडींग २' सिनेमात करीना दिसणार आहे. करीनाची भूमिका असलेला 'द बंकिंगहम मर्डर' हा सिनेमाही ओटीटीवर चांगलाच लोकप्रिय ठरला.

Web Title: actress Kareena Kapoor khan work in Hollywood after singham again movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.