लग्नाच्या ५ वर्षानंतर अभिनेत्री किर्ती कुलहारी आणि साहिल सहगल होतायेत विभक्त, सोशल मीडियावर दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 01:58 PM2021-04-01T13:58:06+5:302021-04-01T13:58:35+5:30

कागदांवर नाही तर आयुष्यभरासाठी वेगळे होत असल्याचे किर्ती कुलहारीने पोस्टमध्ये म्हटले आहे.

Actress Kirti Kulhari and Sahil Sehgal are separated after 5 years of marriage, information given on social media | लग्नाच्या ५ वर्षानंतर अभिनेत्री किर्ती कुलहारी आणि साहिल सहगल होतायेत विभक्त, सोशल मीडियावर दिली माहिती

लग्नाच्या ५ वर्षानंतर अभिनेत्री किर्ती कुलहारी आणि साहिल सहगल होतायेत विभक्त, सोशल मीडियावर दिली माहिती

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री किर्ती कुलहारी हिने तिचा नवरा साहिल सहगलपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. सोशल मीडियावर किर्तीचे चाहते तिचा हा निर्णय ऐकून हैराण झाले आहेत आणि तिला स्ट्राँग राहण्याचा सल्ला देत आहेत. 

किर्ती कुलहारीने सोशल मीडियावर लिहिले की, सर्वांच्या माहितीसाठी सांगते की, मी आणि माझा नवरा साहिल आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. कागदांवर नाही तर आयुष्यभरासाठी. कोणासोबत असण्यापेक्षा कोणापासून वेगळे होण्याचा निर्णय खूप कठीण असतो. पण जे आहे ते बदलू शकत नाही. जे सर्व लोक ज्यांना माझी काळजी वाटते त्यांना मी सांगू इच्छिते की मी ठीक आहे. यानंतर मी कोणतीच कमेंट करणार नाही.


किर्ती कुलहारी आणि साहिल एकत्र काम केले होते. त्या दोघांनी एका जाहिरातीत एकत्र काम केले होते आणि तिथूनच त्यांच्या नात्याला सुरूवात झाली होती. दोन महिन्यांच्या डेटिंगनंतर किर्तीने साहिलला लग्नासाठी प्रपोझ केले होते. शेवटी २०१६ साली त्या दोघांनी लग्न केले. आता लग्नाला जवळपास पाच वर्षे झाल्यानंतर त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.


किर्ती कुलहारीने २०१० साली खिचडी चित्रपटातून रुपेरी पडद्यावरील आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. मागील वर्षी तिची रिलीज झालेली वेबसीरिज क्रिमिनल जस्टिसमधील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले होते.


किर्ती आपल्या पर्सनल लाइफला घेऊन खूप प्रोटेक्टिव आहे आणि त्याबद्दल ती जास्त बोलणे पसंत करत नाही. तर साहिल बद्दल सांगायचे तर तो खूप प्रायव्हेट पर्सन आहे. सोशल मीडियावर त्याचे फार कमी फोटो आहेत.


 

Web Title: Actress Kirti Kulhari and Sahil Sehgal are separated after 5 years of marriage, information given on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.