चित्रपटांमध्ये फ्लॉप ठरूनही ‘या’ अभिनेत्री जगतात आलिशान लाइफ !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 12:01 PM2018-05-11T12:01:47+5:302018-05-11T19:12:11+5:30
बरेचसे असे कलाकार आहेत, जे बॉलिवूडमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकले नाहीत. वास्तविक या कलाकारांना अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची ...
अमृता अरोरा : एका श्रीमंत उद्योगपतीशी लग्न केल्यानंतर अभिनेत्री अमृता अरोरा पडद्यावरून गायब झाली. सध्या ती अतिशय लक्झरी लाइफ जगत आहे. वास्तविक बॉलिवूडमध्ये ती स्वत:ला सिद्ध करू शकली नाही. मात्र अशातही आज ती महागड्या गाड्यांमध्ये फिरताना दिसते.
ट्विंकल खन्ना : दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्ना बॉलिवूडमध्ये फारसा करिष्मा दाखवू शकली नाही. मात्र अशातही ती तिच्या लाइफस्टाइलमुळे चर्चेत असते. सध्या ट्विंकल स्तंभलेखिका आणि निर्माती म्हणून काम करीत आहे. सुपरस्टार अक्षयकुमारची पत्नी असलेल्या ट्विंकलला सडेतोड बोलण्यासाठी ओळखले जाते.
आयशा टाकिया : अभिनेत्री आयशा टाकिया हिलादेखील चित्रपटांमध्ये फारसे यश मिळविता आले नाही. फरहान आजमी याच्याशी लग्न केल्यानंतर तिने पडद्यापासून दूर राहणे पसंत केले. आयशाच्या पतीकडे पॉलिटिकल पॉवर तर आहेच, शिवाय हॉटेल व्यवसायातही ते सक्रिय आहेत.
सेलिना जेटली : बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळूनदेखील यश मिळत नसल्याने सेलिना जेटलीने वैवाहिक जीवनात रममाण होणे योग्य समजले. तिने आॅस्ट्रेलियाच्या श्रीमंत पीटरशी विवाह केला. पीटरचे दुबई आणि सिंगापूरमध्ये बरेचसे हॉटेल आहेत. तीन मुलांची आई असलेली सेलिना सध्या एलजीबीटी कम्युनिटीला सपोर्ट करीत आहे.
शमिता शेट्टी : अभिनेत्री शमिता शेट्टी फार कमी चित्रपटांमध्ये झळकली, मात्र अशातही ती नेहमीच एक्सपेंसिव्ह डेस्टिनेशन्समध्ये हॉलिडे एन्जॉय करताना बघावयास मिळते. महागड्या हॅण्डबॅग्स आणि आपल्या आलिशान लाइफस्टाइलमुळे ती नेहमीच चर्चेत असते.