'सगळा आसमंत रडतोय, जसं...'; पतीच्या आठवणीत मंदिरा बेदीने लिहिली भावनिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 14:45 IST2022-07-01T14:45:07+5:302022-07-01T14:45:33+5:30
Mandira bedi: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मंदिराने राज कौशलचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरुन तिने घरात राजचं वर्षश्राद्ध केल्याचं दिसून येत आहे. सोबतच तिने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे.

'सगळा आसमंत रडतोय, जसं...'; पतीच्या आठवणीत मंदिरा बेदीने लिहिली भावनिक पोस्ट
बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी अनेकदा अभिनयाव्यतिरिक्त तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत येत असते. मागील वर्षी मदिराच्या पतीचं राज कौशलचं निधन झालं. पतीच्या निधनानंतरही मंदिराने स्वत:सह मुलांना उत्तमरित्या सांभाळलं. ज्यामुळे तिची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. यामध्येच आता राज कौशलचं निधन होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यामुळे मंदिराने त्याच्या आठवणीत एक भावुक पोस्ट लिहिली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मंदिराने राज कौशलचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरुन तिने घरात राजचं वर्षश्राद्ध केल्याचं दिसून येत आहे. सोबतच तिने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे.
"तुझ्याशिवाय 365 दिवस. दोन दिवसांची प्रार्थना आणि तुझ्यासाठी खूप सारं प्रेम राज..संपूर्ण आसमंत तुझ्यासाठी दिवसभर रडत राहिला, ज्याप्रमाणे आम्ही रडलो होतो. तू जिथे कुठे असशील शांततेत आणि आनंदात राहा," अशी पोस्ट मंदिराने लिहिली आहे. तिच्या या पोस्टवरुन ती भावनिकरित्या किती खचली आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
दरम्यान, मंदिरा आणि राजने १९९९ मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना वीर हा मुलगा असून त्यांनी तारा या मुलीला दत्तक घेतलं आहे. मंदिराप्रमाणेच राजदेखील अभिनेता होता. त्याने 'प्यार में कभी-कभी' आणि 'शादी का लड्डू' या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.