वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई; बोल्ड मॅटर्निटी फोटोशूटमुळे आली चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 17:36 IST2022-07-17T17:36:28+5:302022-07-17T17:36:53+5:30
Namita vankawala: नमिता तेलुगू कलाविश्वातील प्रसिद्द अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तिचा तगडा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई; बोल्ड मॅटर्निटी फोटोशूटमुळे आली चर्चेत
सध्या कलाविश्वातील अनेक अभिनेत्री त्यांच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत येत आहेत. अलिकडेच सोनम कपूरने (sonam kapoor) आई होणार असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. त्यानंतर आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे वयाच्या ४१ व्या वर्षी ही अभिनेत्री आई होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे.
दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री नमिता वांकावाला (namita vankawala) लवकरच आई होणार आहे. नमिताने वयाच्या ४१ व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला असून नुकतेच तिने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, नमिता तेलुगू कलाविश्वातील प्रसिद्द अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तिचा तगडा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे तिने ही गुडन्यूज शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. नमिताने 2017 मध्ये वीरेंद्र चौधरीसोबत लग्न केलं आहे.