प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीला अटक; EX बॉयफ्रेंडला जिवंत जाळल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 09:17 IST2024-12-03T09:13:45+5:302024-12-03T09:17:04+5:30
बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीची बहीण आलिया हिला न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीला अटक; EX बॉयफ्रेंडला जिवंत जाळल्याचा आरोप
नवी दिल्ली - प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि रॉकस्टार फेम नर्गिस फाखरीची बहीण आलिया फाखरीला न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली आहे. बॉयफ्रेंडला जिवंत जाळल्याचा आरोप तिच्यावर आहे. ४३ वर्षीय आलियाने २ मजली गॅरेजला आग लावली ज्यात तिचा बॉयफ्रेंड आणि एका महिलेचा जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डेली न्यूजच्या रिपोर्टनुसार, थर्मल इंजरीमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. मात्र आलिया फाखरीच्या आईने मुलीवरील आरोप चुकीचे असून ती कुणाची हत्या करू शकत नाही असा दावा केला आहे.
आगीच्या घटनेत ३५ वर्षीय एडवर्ड जॅकब्स आणि ३३ वर्षीय अनास्तासिया यांचा मृत्यू झाला आहे. हे दोघे ज्या गॅरेजमध्ये होते त्याला आलियाने आग लावल्याचा आरोप आहे. या आगीत भाजल्याने दोघांचा मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. स्थानिकांनी सांगितले की, आम्हाला काहीतरी जळण्याचा वास येत होता. नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही बाहेर गेलो तेव्हा बाजूच्या गॅरेजला आग लागली होती. आलिया कायम तुझं घर जाळून टाकणार, तुला मारणार असं तिच्या बॉयफ्रेंडला बोलायची असं काही लोकांनी म्हटलं.
१ वर्षापूर्वीपर्यंत दोघं रिलेशनशिपमध्ये होते
नर्गिस फाखरीची बहीण आलिया आणि मृत एडवर्ड हे दोघे १ वर्षापूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. एडवर्डच्या आईने सांगितले की, दोघे एक वर्षापूर्वी वेगळे झालेत. आलिया त्या गोष्टीला स्वीकारायला तयार नव्हती. सूडबुद्धीने आलियाने एडवर्ड आणि त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळले असा आरोप आईने केला. या प्रकरणी पोलिसांनी आलियाला अटक केली असून अद्याप कोर्टाने तिला जामीन दिला नाही.
दरम्यान, आलियाने कुणाची हत्या केली असेल असं मला वाटत नाही. ती खूप चांगली व्यक्ती आहे. प्रत्येकाची काळजी घेते आणि प्रत्येकाला मदत करते असं आलिया फाखरीच्या आईने म्हटलं. एडवर्डने आलियाशी ब्रेकअप करून वर्ष उलटले होते. त्याने एका अपार्टमेंटचं गॅरेजमध्ये रुपांतर करून त्याठिकाणी काम कर होता. त्यावेळी एडवर्ड आणि त्याची मैत्रिण होती. या गॅरेजला आग लागली आणि त्यात दोघांनी जीव गमावला.