अॅडवेंचरच्या नादात थेट नदीत जावून पडली अभिनेत्री नताशा सूरी! बंजी जंपिंग करतांना गंभीर जखमी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 06:11 AM2018-03-21T06:11:20+5:302018-03-21T11:42:59+5:30
फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री नताशा सूरी अॅडवेंचर स्पोर्ट्सच्या नादात थेट रूग्णालयात पोहोचलीयं. होय, मनीष पॉलसोबत ‘बा ...
फ मिना मिस इंडियाचा किताब जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री नताशा सूरी अॅडवेंचर स्पोर्ट्सच्या नादात थेट रूग्णालयात पोहोचलीयं. होय, मनीष पॉलसोबत ‘बा बा ब्लॅक शीप’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणारी नताशा सध्या रूग्णालयात आहे. एका लग्झरी स्टोरच्या उद्घाटनासाठी नताशा इंडोनेशियाला गेली होती. नताशाला अॅडवेंचर स्पोर्ट्स प्रचंड आवडतात. याचमुळे वर्क कमिटमेंट पूर्ण केल्यानंतर अॅडवेंचरची चाहती असलेल्या नताशाने इंडोनेशियात आणखी काही दिवस थांबण्याचा निर्णय घेतला आणि ती बंजी जंपिंगसाठी पोहोचली. पण जंपिंगदरम्यान तिच्या पायाला बांधलेला दोर अचानक तुटला आणि नताशा डोक्याच्या भारावर थेट नदीत जावून पडली. इतक्या उंचीवरून पडल्यामुळे नताशा गंभीर जखमी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने पाण्यात पडल्याने नताशा बचावली. पाण्याऐवजी इतक्या उंचीवरून जमिनीवर पडली असती तर नताशाच्या जीवावर बेतू शकले असते. तूर्तास डॉक्टरांनी नताशा धोक्याबाहेर असल्याचे स्पष्ट केले आहे. गंभीर जखमी झाल्याने तूूर्तास नताशा डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतरचं ती भारतात परतणार आहे.
बंजी जंपिंग हा अॅडवेंचर स्पोर्ट्समधील सर्वाधिक लोकप्रीय खेळ आहे. यात तुम्हाला एका उंच ठिकाणावरून उडी घ्यायची असते. यादरम्यान एक दोर तुमच्या पायाला बांधलेला असतो. जो तुम्हाला सपोर्ट करतो.
२००६ मध्ये नताशाने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. तिने आत्तापर्यंत सुमारे ६०० वर फॅशन शो केले आहेत. अनेक वेबसीरिजमध्ये तिने काम केले आहे. लवकरच ती ‘बा बा ब्लॅक शिप’ या विनोदी चित्रपटात दिसणार आहे. येत्या २३ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. मनीष पॉल या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे.