तुमचा धर्म कोणता? रुग्णालयात हा प्रश्न विचारताच संतापल्या नीना गुप्ता, म्हणाल्या…

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 12:10 PM2024-02-21T12:10:30+5:302024-02-21T12:13:17+5:30

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी संताप व्यक्त केला. 

actress neena gupta angry on religion column in hospital registration form | तुमचा धर्म कोणता? रुग्णालयात हा प्रश्न विचारताच संतापल्या नीना गुप्ता, म्हणाल्या…

तुमचा धर्म कोणता? रुग्णालयात हा प्रश्न विचारताच संतापल्या नीना गुप्ता, म्हणाल्या…

 ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) त्यांच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्यांचे विचार आणि राहणीमान खूपच बोल्ड आहे. वयाच्या साठीतही त्या कोणतीच भूमिका करायला नाही म्हणत नाहीत. नीना यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. नीना यांना रुग्णालयात चेकअप करण्यासाठी पोहचल्या असता तिथे त्यांना धर्म विचारण्यात आल्याने त्या चिडल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी संताप व्यक्त केला. 

सध्या नीना दिल्लीत असून त्यांची यांची प्रकृती बरी नाही. 'आज तक' वृत्तानुसार, नीना गुप्ता चेकअपसाठी एका रुग्णालयात गेल्या होत्या. पण, आजारी असूनही चेकअपपूर्वी माहिती भरण्यासाठी त्यांना भलामोठा फॉर्म देण्यात आला होता. पण फॉर्ममध्ये त्यांना धर्म विचारण्यात आला.  इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर केला.  मोठ्या रुग्णालयात नोंदणी फॉर्म भरत असून फार आजारी नसले तरी हा फॉर्म भरता-भरता मी आणखी आजारी पडेन, असे त्या म्हणाल्या. फॉर्ममध्ये धर्माचा कॉलम पाहिल्यावर 'अरे हे अजुनही सुरुच आहे. अरे देवा, आता आमचं काय होणार?', असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

नीना गुप्ता शेवटची 'मस्त में रहने का' चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत जॅकी श्रॉफ दिसला होता. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला. तर नीना गुप्ता लवकरच 'मेट्रो इन जिनों' या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात त्या सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, अली फजल आणि फातिमा सना शेखसोबत स्क्रीन शेअर करताना दिसतील. तसेच रानी मुखर्जी यांच्या 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' आणि विशाल भारद्वाज यांच्या 'चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलंग वॅली' या सीरिजमध्येही त्यांनी काम केलं आहे. 

Web Title: actress neena gupta angry on religion column in hospital registration form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.