तब्बल तीन तास बाल्कनीत अडकली ‘ही’ अभिनेत्री; डासांनी केले हैराण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 03:46 PM2018-04-24T15:46:59+5:302018-04-24T21:38:33+5:30
अभिनेत्री एली अवरामची गेली रात्र (सोमवारी) खूपच भयावह आणि वेदनादायी राहिली. त्याचे झाले असे की, ती तिच्या घराच्या बाल्कनीत ...
अ िनेत्री एली अवरामची गेली रात्र (सोमवारी) खूपच भयावह आणि वेदनादायी राहिली. त्याचे झाले असे की, ती तिच्या घराच्या बाल्कनीत बसली होती. मात्र अचानकच बाल्कनीचा दरवाजा लॉक झाल्याने तिला बराच वेळ त्याठिकाणी अडकून राहावे लागले. अथक प्रयत्नानंतर बाल्कनीचा दरवाजा उघडून तिची सुटका करण्यात आली. तब्बल तीन तास बाल्कनीत अडकून पडलेल्या एलीला डासांचा चांगलाच सामना करावा लागला. तिच्या शरीरावर विविध ठिकाणी डासांनी चावा घेतल्याने तिला चांगल्याच वेदना सहन कराव्या लागल्या.
याविषयी एलीने सांगितले की, मदतीसाठी मी माझ्या मेडला जवळपास दहा वेळा कॉल केला. त्यानंतर तिने माझा कॉल रिसिव्ह करून माझी याठिकाणाहून सुटका केली. बाल्कनीची लाइट बंद असल्याने अंधारात डासांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. मेडला बरेच कॉल केल्याने फोनची बॅटरीही लो झाली होती. त्यामुळे रात्र बाल्कनीतच काढावी लागेल की काय? या विचारानेच प्रकृती खालावली होती. परंतु मेडने वेळीच कॉल रिसिव्ह केल्याने माझी सुटका करणे शक्य झाले.
दरम्यान, एली अवराम स्वीडनची आहे. वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये झळकलेल्या एलीने बॉलिवूडमध्ये नशीब आजमाविले आहे. २०१३ मध्ये बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्यानंतर २०१४ आणि २०१५ मध्ये तिने याच शोमध्ये गेस्ट अपियरेंस दिले होते. त्याचबरोबर एलीने ‘मिकी वायरस’ या बॉलिवूड चित्रपटातही आपल्या अभिनयाची झलक दाखविली. तसेच ‘किस किस को प्यार करूं, पोस्टर बॉयज आणि नाम शबाना’ यासारख्या चित्रपटातही ती बघावयास मिळाली. लवकरच एली तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये बघावयास मिळणार आहे.