प्रियंका चोप्रा आणि परिणिती चोप्रा यांच्यात भांडण? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 04:10 PM2024-08-30T16:10:42+5:302024-08-30T16:22:49+5:30

प्रियंका चोप्रा आणि परिणिती चोप्रा या बी-टाऊनमधल्या बहिणी नेहमीच चर्चेत असतात.

Actress Parineeti Chopra's absence from cousin Priyanka Chopra's Brother's Engagement Fans Gossip About Is Fight Between Sisters | प्रियंका चोप्रा आणि परिणिती चोप्रा यांच्यात भांडण? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

प्रियंका चोप्रा आणि परिणिती चोप्रा यांच्यात भांडण? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

प्रियंका चोप्रा  (Priyanka Chopra) आणि परिणिती चोप्रा (Parineeti Chopra) या दोन बहिणी नेहमीच चर्चेत असतात. प्रियंका आंतरराष्ट्रीय स्टार आहे. तर परिणितीही बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. परिणितीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतल्यापासून प्रियंका तिला सपोर्ट करताना दिसून आली. परिणितीच्या साखरपुड्यातही खास प्रियंका भारतात आली होती. पण, आता दोघींमध्ये भांडण झाल्याचं बोललं जात आहे. 

नुकतंच प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थचा साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रियंका भारतात आली होती. हा कार्यक्रम अगदी खाजगी ठेवण्यात आला होता. संपुर्ण चोप्रा कुटुंब यात सहभागी झाल्याचं दिसून आलं. पण, परिणीती चोप्रा मात्र कुठेच दिसली नाही. ती या समारंभाला गैरहजर होती.  यावरुनच दोघींमध्ये काही बिनसलं की काय, असा प्रश्न दोघींच्याही चाहत्यांना पडला आहे.


दरम्यान, जेव्हा परिणीती चोप्राने आम आदमी पार्टीचे आमदार राघव चड्ढा यांच्याशी लग्न केले होते. तेव्हा प्रियंका चोप्रा तिच्या कामामुळे त्या लग्नाचा भाग होऊ शकली नव्हती. लग्नाला आली नाही म्हणून तर प्रियंकावर परिणीती नाराज नसेल ना, असा अंदाज चाहते बांधताना दिसत आहेत. पण, याबबात अद्याप प्रियंका किंवा परिणीतीने कोणतंही भाष्य केलेलं नाही. 


परिणीती आणि प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच परिणीतीचा 'चमकिला' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमानं चाहत्यांचं मन जिंकल. तर प्रियंकाबाबत बोलायचं झाल तर ती लवकरच  'द ब्लफ'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियंकानं 'द ब्लफ' सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान ती अनेकदा जखमीदेखील झाली होती. 
 

Web Title: Actress Parineeti Chopra's absence from cousin Priyanka Chopra's Brother's Engagement Fans Gossip About Is Fight Between Sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.