कोलकातामध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीवर हल्ला, घाबरलेल्या अवस्थेत शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 09:40 AM2024-08-24T09:40:02+5:302024-08-24T09:40:55+5:30

अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत दाखवली परिस्थिती

actress Payel Mukherjee shared video where she was attacked by a biker in Kolkata | कोलकातामध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीवर हल्ला, घाबरलेल्या अवस्थेत शेअर केला Video

कोलकातामध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीवर हल्ला, घाबरलेल्या अवस्थेत शेअर केला Video

कोलकातामध्ये डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरण चर्चेत असतानाच आता आणखी एक भयानक घटना घडली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री पायल मुखर्जीच्या (Payel Mukherjee)  गाडीवर चक्क हल्ला झाला. यानंतर तिने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. काल रात्री तिच्या गाडीवर एका दुचाकीस्वाराने हल्ला केला. नक्की काय घडलं वाचा.

अभिनेत्री पायल मुखर्जी काल रात्री गर्दीच्या ठिकाणाहून जात होती. तेव्हा तिच्या गाडीचा आणि दुचाकीस्वाराचा छोटा अपघात झाला. यानंतर त्या माणसाने पायलला आधी गाडीतून बाहेर येण्यास सांगितलं. पण ती बाहेर आली नाही म्हणून त्याने सरळ गाडीची काच फोडली. तिने व्हिडिओ शेअर करत घटनेची वाच्यता केली. यात ती रडताना दिसत आहे. इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये ती म्हणाली, 'क्राइम सीनवरुन पहिला लाइव्ह व्हिडिओ. आपण कुठे राहतोय? जर एका महिलेला रात्रीच्या वेळी गर्दीच्या ठिकाणीही अशा प्रकारे त्रास दिला जात असेल आणि तिच्यासोबत गैरवर्तन केलं जात असेल तर हे चिंताजनक आहे. एकीकडे कोलकातामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर रॅली काढण्यात येत आहेत दुसरीकडे हे उदाहरण आहे. हेच जर माझ्यासोबत सुनसान ठिकाणी झालं असतं तर मी काय केलं असतं हा विचार करुनच मला भीती वाटत आहे.'


पायलने दुचाकीस्वाराच्या बाईकचा फोटोही शेअर केला आहे. यात त्याच्या गाडीला काहीच झालेलं नाही. तरी त्याने अभिनेत्रीच्या गाडीची काच तोडली. यामुळे अभिनेत्री प्रचंड घाबरली आहे.


कोलकाता मध्ये सध्या महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शहरातील आर जी कर मेडिकल कॉलेजमध्ये रात्री एका डॉक्टरवर बलात्कार होतो आणि तिची निर्घृण हत्या होते तरी अजून त्या आरोपीला शिक्षा झालेली नाही. यामुळे शहरात रोज सरकारविरोधात निदर्शने होत आहेत.

Web Title: actress Payel Mukherjee shared video where she was attacked by a biker in Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.