मोहब्बतें सिनेमातील अभिनेत्री आहे या अभिनेत्याची पत्नी, १९ वर्षांत इतकं बदलले तिचे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 11:28 AM2019-10-26T11:28:37+5:302019-10-26T11:47:53+5:30

'मोहब्बतें’ मधील या अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण.

Actress Preeti jhangiani married to actor parvin dabas | मोहब्बतें सिनेमातील अभिनेत्री आहे या अभिनेत्याची पत्नी, १९ वर्षांत इतकं बदलले तिचे आयुष्य

मोहब्बतें सिनेमातील अभिनेत्री आहे या अभिनेत्याची पत्नी, १९ वर्षांत इतकं बदलले तिचे आयुष्य

googlenewsNext

सन २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मोहब्बतें’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. याच चित्रपटातील एक चेहरा म्हणजे, ‘मोहब्बतें’ गर्ल प्रिती झंगियानी. प्रिती आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण  सोशल मीडियावर मात्र कमालीची सक्रिय आहे. अर्थात इतक्या वर्षांत ही ‘मोहब्बतें’ गर्ल इतकी बदललीय की, तिला ओळखणे कठीण होईल.


‘मोहब्बतें’ या चित्रपटानंतर प्रितीने बॉलिवूडमध्ये टिकून राहण्याचे बरेच प्रयत्न केलेत. पण दुर्दैवाने यानंतरचे तिचे चित्रपट धडाधड आपटलेत. एलओसी, आन, अनर्थ या चित्रपटात ती दिसली. पण तिचे हे चित्रपट सुपरडुपर फ्लॉप ठरलेत. अखेर प्रितीने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला.


१८ आॅगस्ट १९८० रोजी मुंबईतील सिंधी कुटुंबात प्रितीचा जन्म झाला.  सर्वप्रथम राजश्री प्रोडक्शनच्या ‘ये है प्रेम’ मध्ये ती झळकली. त्यानंतर ‘छुई मुई सी तुम लगती हो’ आणि ‘कुड़ी जच गई’ या गाण्यात ती दिसली. या गाण्यांमुळे प्रितीला कमालीची लोकप्रियता मिळाली. पुढे प्रितीने  काही जाहिरातीही केल्या. पण जम बसत नाही म्हटल्यावर २००८ मध्ये तिने बॉलिवूड करिअर सोडून लग्न करण्याचा निर्णय घेतला.


मॉडेल व अ‍ॅक्टर प्रवीण डब्बाससोबत तिने लग्नगाठ बांधली.  प्रितीचा पती प्रवीण अभिनेताव्यतिरीक्त स्कुबा ड्रायव्हिंगही करतो. त्याला अंडरवॉटर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचीही आवड आहे. २०११ मध्ये प्रितीने पहिल्या बाळाला जन्म दिला. त्याचे नाव जयवीर आहे.यानंतर २०१६ मध्ये प्रिती दुसºयांदा आई बनली. बाळाचे नाव देव असे ठेवण्यात आले.


प्रिती सध्या कुटुंबासोबत मुंबईत राहते.  आपल्या मुलांच्या संगोपनात ती बिझी आहे. ३८ वर्षांची प्रिती आजही स्वत:ला फिट ठेवते.  प्रितीचा ‘मोहब्बतें’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. पण या चित्रपटातील किम शर्मा व शमिता शेट्टी यांच्यासारखेच प्रितीचे करिअरही फ्लॉप राहिले.

Web Title: Actress Preeti jhangiani married to actor parvin dabas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.