भारतातून गेलीस अन्....; प्रियांका चोप्राने निकसोबतचा 'तो' फोटो पोस्ट केला अन् सोशल मीडियावर झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 09:20 AM2021-08-31T09:20:00+5:302021-08-31T09:21:47+5:30

भारतातून गेलीस आणि जणू सर्व लाज विकून खाल्ली, अशी संतप्त कमेंट एका युजरने केली.  

actress Priyanka Chopra share a photo with husband and singer Nick Jonas | भारतातून गेलीस अन्....; प्रियांका चोप्राने निकसोबतचा 'तो' फोटो पोस्ट केला अन् सोशल मीडियावर झाली ट्रोल

भारतातून गेलीस अन्....; प्रियांका चोप्राने निकसोबतचा 'तो' फोटो पोस्ट केला अन् सोशल मीडियावर झाली ट्रोल

googlenewsNext

प्रियांका चोप्रा सध्या बॉलीवूडपासून दूर आहे, पण म्हणून चर्चा कमी नाही. या ना त्या कारणाने प्रियांका सतत चर्चेत असते. सध्या प्रियांका लंडनमध्ये तिच्या हॉलिवूड सिनेमाचं शूटिंग करतेय. तूर्तास मात्र प्रियांका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, इन्स्टाग्रामवर तिने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या काही चाहत्यांना आवडला आहे, पण काहींनी मात्र यावरून प्रियांकाला चांगलंच ट्रोल केलंय.

असे फोटो शेअर करायला लाज वाटत नाही का, अशा आशयाच्या अनेक कमेंटस् या फोटोवर पाहायला मिळताहेत. या फोटोत प्रियांका निक जोनाससोबत  आहे. बिकिनी घातलेली प्रियांका झोपलेली आहे. हा फोटो शेअर करताना प्रियांकाने स्वत:ला स्रॅक्स म्हटले आहे. हा फोटो पाहून काहींचा पारा चढला. मग काय, या लोकांनी प्रियांकाला चांगलंच ट्रोल केलं. भारतातून गेलीस आणि जणू सर्व लाज विकून खाल्ली, अशी संतप्त कमेंट एका युजरने केली.  

Web Title: actress Priyanka Chopra share a photo with husband and singer Nick Jonas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.