चॅलेंज ! फोटोत दिसणार ही क्युट मुलगी आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 20:10 IST2022-01-06T20:02:09+5:302022-01-06T20:10:38+5:30
बॉलिवूड अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो (Bollywood Actress Childhood Pics) सोशल मीडियावर चर्चेत आहेत..

चॅलेंज ! फोटोत दिसणार ही क्युट मुलगी आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री
गेलेली वेळ कधीच परत येत नाही, फक्त आठवणीच राहतात! पण काही खास क्षण आपण कॅमेऱ्यात टिपतो. मग जेव्हा जेव्हा ते फोटे समोर येतात तेव्हा तो काळही डोळ्या पुढे उभा राहतो. बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो (Bollywood Actress Childhood Pics) सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो पाहून लोक तिला ओळखत नाहीत, कोण आहे आईच्या कडेवर बसलेली ही चिमुकली मुलगी. तुम्हाला एक हिंट देतो, ही मुलगी आज हॉलिवूडमध्येही आपलं नावं गाजवतेय, आणि बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या अभिनेत्रीने सलमान खान (Salman khan), शाहरुख खान(Shah Rukh Khan)सोबत काम केले आहे.
ही गोंडस मुलगी दुसरी कोणी नसून प्रियंका चोप्रा आहे. अनुष्का शर्माने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. 18 जुलै 1982 रोजी जमशेदपूर, बिहार (सध्या झारखंडमध्ये) जन्मलेल्या प्रियंकाची आज वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. बॉलिवूडची सर्वाधिक महागड्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. देशात लोकप्रिय असलेली ही देसी गर्ल विदेशातही लोकप्रियता मिळवण्यास यशस्वी ठरली. त्यामुळे प्रियांका आज ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रियांकाने २०१८मध्ये अमेरिकन गायक निक जोनाससोबत (nick jonas) लग्नगाठ बांधली.