अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या भावाला अटक, कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 05:31 PM2024-07-15T17:31:29+5:302024-07-15T17:34:39+5:30

नुकतंच जॅकी भगनानीसोबत लग्न झालेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला भावाला पोलिसांनी अटक केलीय (rakul preet singh)

Actress Rakul Preet Singh brother amanpreet singh arrested in drug racket case | अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या भावाला अटक, कारण ऐकून बसेल धक्का

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या भावाला अटक, कारण ऐकून बसेल धक्का

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगविषयी एक महत्वाची बातमी समोर येतेय. रकुलचा भाऊ अमनप्रीत सिंगला पोलिसांनी अटक केलीय. त्यामुळे सर्वांना धक्का बसलाय. सायबराबाद पोलिसांनी ड्रग्जच्या प्रकरणात अमनप्रीतला अटक केलीय. तेलगू चॅनलमधील मीडिया रिपोर्टसनुसार, चार नायजेरीयन माणसांकडून अमनप्रीतला ड्रग्ज खरेदी करताना पोलिसांनी करताना रंगेहाथ पकडलं. त्यामुळे पोलिसांनी अमनप्रीतला अटक केली.

अमनप्रीतवर आरोप काय?

सांगण्यात येतंय की, अमनप्रीत ज्या पेडलर्सकडून ड्रग्ज खरेदी होता त्याच्याकडे २ कोटी किमतीचे २०० ग्राम कोकेन होते. त्याच्याकडून कोकेन जप्त करण्यात आलं आणि पेडलर्सलाही अटक केली. पेडलर्सकडून ड्रग्ज खरेदी करताना पकडल्याने अमनप्रीतलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रकुल प्रीत सिंगचा भाऊ अमनप्रीत सुद्धा नवोदित अभिनेता आहे. हैदराबाद पोलिसांनी राजेंद्र नगरमधील ड्रग्ज रॅकेटचा तपास करण्याचे मिशन हाती घेतले. राजेंद्र नगरमधील पोलीस आणि स्पेशल ऑपरेशन टीम यांनी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात रकुलच्या भावाला अटक झाली.

याआधी ड्रग्ज प्रकरणात रकुल प्रीतचीही चौकशी

याआधी रकुल प्रीत सिंगचीही मनी लाँड्रींग आणि ड्रग्ज रॅकेट प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये हैदराबादमधील ईडीसमोर रकुल प्रीतला खूप तास चौकशीला सामोरे जावे लागले. याशिवाय एजन्सीने संशयास्पद बाबी आढळल्याने रकुल प्रीतला बँक स्टेटमेंट द्यायलाही सांगितलं होतं. आता रकुल प्रीतच्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्याने त्याच्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

Web Title: Actress Rakul Preet Singh brother amanpreet singh arrested in drug racket case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.