'जुडवा' सिनेमातील ही अभिनेत्री करणार १४ वर्षांनंतर कमबॅक, आता तिला ओळखणं झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:04 IST2025-03-10T17:03:53+5:302025-03-10T17:04:36+5:30
Actress Rambha : अभिनेत्री रंभा एकेकाळची प्रसिद्ध कलाकार होती. लग्नानंतर ती सिनेइंडस्ट्री पासून दुरावली. मात्र आता ती कमबॅक करणार असल्याचं बोललं जात आहे.

'जुडवा' सिनेमातील ही अभिनेत्री करणार १४ वर्षांनंतर कमबॅक, आता तिला ओळखणं झालंय कठीण
बॉलिवूड अभिनेत्री रंभा(Actress Rambha)ने 'क्यूंकी...मैं झुठ नहीं बोलता', जुडवा, आणि 'बंधन' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती एकेकाळची प्रसिद्ध कलाकार होती. लग्नानंतर ती सिनेइंडस्ट्री पासून दुरावली. मात्र आता ती कमबॅक करणार असल्याचं बोललं जात आहे.
रंभाने वयाच्या १५ व्या वर्षी मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सरगम'मध्ये विनीतसोबत काम केले. त्याच वर्षी तिने त्याच्यासोबत 'संपाकुलम थाचन'मध्येही काम केले. यानंतर ती १९९३ साली तेलुगू चित्रपट 'आ ओक्काडू अदुसु'मध्ये दिसली. रंभाने तमिळमध्ये 'उझावन'मधून पदार्पण केले. यानंतर 'उल्लाथाई अल्लिथा', 'सुंदर पुरुष', 'सेनगोट्टाई', व्हीआयपी, 'अरुणाचलम' आणि 'कथाला कथाला' यांसारख्या चित्रपटांतून ती प्रसिद्धी झोतात आली. 'अझगिया लैला' या गाण्यातून ती जगभर प्रसिद्ध झाली. 'पेन सिंगम' या चित्रपटात शेवटची दिसलेल्या रंभाने २०१० मध्ये कॅनेडियन उद्योगपती इंद्रकुमार पद्मनाभन यांच्याशी लग्न केले आणि ती परदेशात स्थायिक झाली. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. रिपोर्ट्सनुसार, रंभाकडे २००० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
रंभाचे चित्रपट
गेल्या काही वर्षांत रंभा हिने ‘मंदा मयिलाडा’ आणि ‘जोडी नंबर १’ यासारख्या रिॲलिटी शोमध्ये जज म्हणून भाग घेतला आहे. २०१७ मध्ये, तिने विजय टीव्हीवर 'किंग ऑफ ज्युनियर' शोची परीक्षण केले. मात्र, ती चित्रपटांपासून दूर राहिली. आता रंभा विजय टीव्हीवरील 'जोडी: आर यू रेडी' या डान्स शोच्या नवीन सीझनमध्ये जज म्हणून परत येणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या सीझनमध्ये सँडी, श्रीदेवी आणि मीना जज होत्या. या सीझनमध्ये मीनाची जागा रंभा घेणार असल्याचं बोललं जात आहे.
रंभा आहे इतक्या कोटींची मालकीण
अलिकडेच एका चित्रपट महोत्सवात चित्रपट निर्माते कलईपुली एस. थानूने खुलासा केला, 'रंभाकडे २००० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तिचा नवरा मोठा बिझनेसमन आहे. त्यांनी माझ्याकडे रंभासाठी चांगला चित्रपट करण्याची संधी मागितली आहे. मी त्यांना आश्वासन दिले की मी एक चांगला प्रोजेक्ट शोधेन.
रंभाच्या नावावर आहे कंपनी
कॅनडामध्ये राहणारे इंद्रकुमार पद्मनाभन अनेक व्यवसाय चालवतात. ते मॅजिक वुड्स या प्रसिद्ध होम इंटिरियर कंपनीचे संचालक आहेत. याशिवाय, ते पाच कंपन्या चालवतात, ज्यामध्ये रंभाच्या नावाची एक कंपनी आहे, त्यापैकी काही चेन्नईमध्ये आहेत.