सुसाईड नोट लिहून मुकेश अग्रवाल यांची आत्महत्या, चिठ्ठीत पत्नी रेखाचा उल्लेख...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 03:41 PM2021-05-31T15:41:30+5:302021-05-31T15:49:30+5:30
सिनेसृष्टीतील ज्या ज्या नायकाशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं तो प्रत्येक नायक रेखा यांचं मन दुखावून त्यांच्यापासून दूर गेला. 1990 मध्ये रेखा यांनी एका बिझनेसमनशी लग्न केलं. मुकेश अग्रवाल असं या बिझनेसमनचं नाव होतं.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री आणि बॉलीवुड दिवा रेखा यांच्या अभिनयावर सारेच फिदा होतात. त्यांच्या अभिनयासह त्यांचं घायाळ करणारं सौंदर्य याची जादू आजही रसिकांवर कायम आहे. मग हीच जादू त्यांच्यासोबत काम केलेल्या त्यांच्या सहकलाकारांवर झाली नसती तरच नवल. रेखा यांचं व्यावसायिक जीवन जितकं गाजलं तितकंच त्याचं खासगी जीवन वादग्रस्त ठरलं. त्यांच्या खासगी जीवनाविषयी कुणालाच फारसं माहित नाही. प्रत्येकाकडे रेखा यांच्या खासगी जीवनाविषयी उलटसुलट माहिती आहे.
सिनेसृष्टीतील ज्या ज्या नायकाशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं तो प्रत्येक नायक रेखा यांचं मन दुखावून त्यांच्यापासून दूर गेला. 1990 मध्ये रेखा यांनी एका बिझनेसमनशी लग्न केलं. मुकेश अग्रवाल असं या बिझनेसमनचं नाव होतं. मात्र लग्नाला एक वर्षही पूर्ण झालं नव्हतं, त्यावेळी मुकेश यांनी आपल्या फार्म हाऊसमध्ये आत्महत्या केली. रेखा आणि मुकेश यांच्यात काही तरी बिनसलं आणि त्यामुळेच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं अशा चर्चा त्यावेळी रंगल्या. इतकेच नाही, तर त्यांच्या निधनानंतर रेखा यांना त्यांच्या नात्यात कोणत्या कारणामुळे मतभेद निर्माण झाले, असे प्रश्न उघडपणे विचारण्यात आले. .
आत्महत्या करण्यापूर्वी मुकेश यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती, त्यात रेखाचाही उल्लेख त्यांनी केला होता. त्यांनी लिहीले होते की, ''रेखाला माझ्या संपत्तीतून काहीच मिळणार नाही. मी रेखासाठी काहीही सोडून जात नाहीय. पैसे कमवण्यासाठी रेखा स्वतः सक्षम आहे''. तर दुसरीकडे मुकेश अग्रवाल यांच्या भावानेही म्हटले होते की, 'ज्यांना असे वाटायचे रेखाने केवळ पैशासाठी मुकेशशी लग्न केले होते, पण रेखाने आमच्याकडे कधीच काही मागितले नाही.' मुकेशच्या मृत्यूनंतर अनेक आरोपही रेखावर लावण्यात आले होते. मुकेश यांच्या निधनानंतर रेखा पुन्हा एकदा जीवनात एकट्या पडल्या. आजही त्यांचा एकाकी जीवनप्रवास सुरु आहे.
रेखा याचं सुखी संसाराचं स्वप्न अधुरंच !
अमिताभ-रेखा यांचा 'दो' अनजाने हा पहिला सिनेमा. या सिनेमापासूनच अमिताभ-रेखा जोडी रसिकांना भावली. यानंतर विविध सिनेमातून अमिताभ-रेखा जोडीनं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं. दोघांच्या अनोख्या केमिस्ट्रीमुळे आणि सिनेमाच्या यशामुळे रिअल लाइफमध्ये दोघं आणखी जवळ आले. अमिताभ आणि रेखा लग्न करणार अशा चर्चाही रंगल्या. मात्र तसं काहीच घडलं नाही. त्याच काळात अमिताभ-रेखा-जया यांच्या प्रत्यक्ष जीवनात सुरु असलेल्या उलथापालथीचं चित्रण करणारा सिलसिला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला.
यांत अमिताभ-रेखा यांचं अव्यक्त प्रेम, त्यांची केमिस्ट्री सिनेमातील विविध सीन्स आणि गाण्यांमधून रसिकांना पाहायला मिळाली. त्यानंतर अमिताभ-रेखा एका सिनेमात कधीच झळकले नाही. विविध कार्यक्रमांमध्ये दोघंही एकमेंकांपासून खूप लांब लांब बसल्याचं पाहायला मिळतं. मात्र कॅमे-याच्या नजरा त्या दोघांवरच असतात. एखाद्या क्षणी दोघं चुकून समोरा समोर आले तर त्याचीही बातमी बनते. त्यामुळेच अमिताभ आणि रेखा यांची लव्हस्टोरी आजही रसिकांसाठी फार मोठं कोडं आहे.