Richa Chadha Pregnancy: रिचा चड्ढाच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; अभिनेत्रीने दिली गुडन्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 12:25 IST2024-02-09T12:23:34+5:302024-02-09T12:25:55+5:30
Richa chadha: रिचा लवकरच आई होणार असून तिने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Richa Chadha Pregnancy: रिचा चड्ढाच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; अभिनेत्रीने दिली गुडन्यूज
बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि तितकीच चर्चेत राहणारी जोडी म्हणडे रिचा चड्ढा (Richa chadha) आणि अली फजल (ali fazal) . लॉकडाउनच्या काळात लग्नगाठ बांधणारी ही जोडी लवकरच एका नव्या भूमिकेत प्रवेश करणार आहेत. या जोडीच्या घरी एका गोड चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नुकतीच या जोडीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते आई-बाबा होणार असल्याचं सांगितलं आहे.
अली फजलने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. अलीने एका कागदावर 1+1=3 असं लिहीत ते आई-बाबा होणार असल्याचं जाहीर केलं. सोबतच, एका छोट्याश्या हृदयाची धडधड आज आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आवाज झालाय, असं कॅप्शन सुद्धा त्यांनी या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या जोडीची जोरदार चर्चा होत असून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.