'मिर्झिया' फेम Saiyami Kherला करावा लागलाय बॉडी शेमिंगचा सामना, म्हणाली-...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 11:16 AM2022-12-09T11:16:45+5:302022-12-09T11:28:36+5:30
सैयामी खेरला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. सावळ्या रंगासाठी तिला अनेकदा टोमणे मारण्यात आले आहेत.
Saiyami Kher Talk About Her Acting: सैयामी खेर 2015 सालापासून तेलुगू चित्रपट 'रे' (Rey)'द्वारे तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. सध्या तिच्या आगामी 'फाडू: अ लव्ह स्टोरी' (Faadu: A Love Story)या वेब सीरिजवर काम करत आहे. यासोबतच अभिनेत्रीने तिच्यासोबत झालेल्या बॉडी शेमिंग(Body Shaming)बद्दलही खुलासा केला आहे.
इंडिया टुडेशी बोलताना सैयामी खेरने बॉडी शेमिंगबद्दल खुलासा केला की 'जे तुम्हाला जज करतात तुमच्याबद्दल वाईट बोलतात'. जेव्हा मी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार होतो तेव्हा मला कोणीतरी सांगितले की तू तुझ्या नाक आणि ओठांची सर्जरी करून घे. तिच्या सावळ्या रंगासाठी तिला अनेकदा टोमणे मारण्यात आले आहेत.
सैयामीने सांगितले की, अशा कमेंट्सचा तिच्यावर फारसा परिणाम होत नाही, कारण मी स्वतःला जसे आहे तसे स्वीकारले आहे. पण जे लोक काहीही बोलतात आणि आपल्या भावनांचा विचार न करता निघून जातात.
बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर सैयामीने मराठी इंडस्ट्रीत डेब्यू केला. सैयामी मराठी अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे. सैयामीने तिच्या आजीचे बरेच चित्रपट पहिलेत. रितेश देशमुखसोबत ‘माऊली’ या सिनेमातून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.अभिनेत्री तन्वीनी रितेशसोबत मराठी चित्रपट ‘लय भारी’ केला आहे. त्यामध्ये त्यांनी रितेशच्या आईची भूमिका वठवली होती.