संस्कृती बालगुडेचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; 'या' सिनेमातून करणार इंडस्ट्रीत एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 11:01 IST2024-04-22T10:59:47+5:302024-04-22T11:01:00+5:30
Sanskruti balgude: संस्कृतीने या सिनेमात शारीब हाश्मी याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

संस्कृती बालगुडेचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; 'या' सिनेमातून करणार इंडस्ट्रीत एन्ट्री
गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड कलाकारांचा मराठी इंडस्ट्रीत येण्याचा ओघ वाढला आहे. त्याचसोबत आता एक एक करत मराठी कलाकारही बॉलिवूडची वाट धरतांना दिसत आहेत. आतापर्यत अनेक मराठी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये त्यांचं नशीब आजमावलं आहे. यामध्येच आता पिंजरा या मालिकेतून नावारुपाला आलेली संस्कृती बालगुडे (sanskruti balgude) ही बॉलिवूड सिनेमात झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
'पिंजरा' या मालिकेत आनंदी ही भूमिका साकारुन संस्कृती घराघरात लोकप्रिय झाली. त्यानंतर काही मालिका, सिनेमा आणि रिअॅलिटी शोज् मध्ये झळकली. मात्र, आता तिने थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्याचं म्हटलं जात आहे. 'करेज' या बॉलिवूड सिनेमात ती झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
नुकतीच 'करेज' या सिनेमाची Wrap Up पार्टी झाली. या पार्टीमध्ये संस्कृती दिसून आली. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच अभिनेता शारीब हाश्मी याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
दरम्यान, संस्कृतीने तिच्या या आगामी प्रोजेक्टविषयी अद्याप तरी चाहत्यांना फारशी माहिती दिलेली नाही. त्यामुळे तिच्याया नव्या भूमिकेविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या सिनेमात ती नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. संस्कृती 'काळे धंदे' या वेबसीरिजमध्येही झळकली होती.