बोल्ड सीन्स देऊनही फ्लॉप झाला पहिलाच सिनेमा, एका निर्णयाने संपले या अभिनेत्रीचे करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 08:00 AM2020-02-16T08:00:00+5:302020-02-16T08:00:02+5:30

कुठे आहे ऋषी कपूरची ही हिरोईन?

actress shoma anand birthday today and her life real facts | बोल्ड सीन्स देऊनही फ्लॉप झाला पहिलाच सिनेमा, एका निर्णयाने संपले या अभिनेत्रीचे करिअर

बोल्ड सीन्स देऊनही फ्लॉप झाला पहिलाच सिनेमा, एका निर्णयाने संपले या अभिनेत्रीचे करिअर

googlenewsNext
ठळक मुद्देछोट्या पडद्यावर नाव कमावल्यानंतर शोमा पुन्हा बॉलिवूडकडे वळली. पण यानंतर तिच्या वाट्याला आलेत ते केवळ सपोर्टींग रोल.

हा फोटो पाहिल्यानंतर या अभिनेत्रीने साकारलेल्या अनेक भूमिका तुमच्या डोळ्यांपुढे येतील. आई, बहीण, पत्नी अशा अनेक भूमिकेत दिसलेली ही अभिनेत्री कोण तर शोमा आनंद. शोमा आनंद आज टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा आहे. पण  ऋषी कपूरची हिरोईन म्हणून तिच्या करिअरची सुरुवात झाली होती.

1976 मध्ये रिलीज झालेल्या ‘बारूद’ या सिनेमात शोमा आनंद लीड रोलमध्ये होती. या चित्रपटात शोमाने अनेक बोल्ड सीन्स दिलेत. पण याऊपरही शोमाचा हा पहिलाच सिनेमा आपटला. यानंतर तिने काही चित्रपट केलेत. पण त्यांना म्हणावे तसे यश लाभले नाही. पुढे बॉलिवूडमधील करिअर मार्गी लागणार त्याआधीच शोमाने असा काही निर्णय घेतला की, बॉलिवूडमध्ये ती केवळ सपोर्टींग रोलपुरतीच मर्यादीत राहिली.

होय, हा निर्णय म्हणजे निर्माता-दिग्दर्शक तारिक शाहसोबतचे लग्न. 1987 मध्ये शोमाने तारिकसोबत लग्न केले. लग्नानंतरही शोमाला इंडस्ट्रीत काम करायचे होते. पण सासरच्या मंडळींचा याला विरोध होता.

या विरोधामुळे शोमाने अखेर इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. मग काय या ब्रेकने तिच्या फिल्मी करिअरलाही मोठा ब्रेक लागला. यानंतर तिच्या वाट्याला आलेत ते केवळ सपोर्टिंग रोल.   

बॉलिवूडने निराशा केल्यानंतर  शोमाने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. ‘हम पांच’ या शोमधून शोमा छोट्या पडद्यावर आली. छोटा पडदा मात्र तिच्यासाठी लकी ठरला. या मालिकेने शोमा घराघरांत पोहोचली. पुढे अनेक मालिकांमध्ये ती दिसली. पण यानंतर  कधी हिरोची बहीण, कधी वहिणी, कधी डॉक्टर अशा भूमिका तिला मिळाल्या. अर्थात या रोलमध्येही शोमाने यादगार अभिनय केला.

Web Title: actress shoma anand birthday today and her life real facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.