अभिनेत्री श्रद्धा कपूरला हवाय असा जोडीदार, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 03:54 PM2023-11-26T15:54:32+5:302023-11-26T15:58:31+5:30
श्रद्धाच्या एका व्हिडीओने सगळ्याचं लक्ष वेधलं.
श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक सुपरहिट चित्रपट तिने दिले आहेत. दमदार अभिनयाचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. श्रद्धा कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतंच श्रद्धाच्या एका व्हिडीओने सगळ्याचं लक्ष वेधलं.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये श्रद्धा कपूर तिला कसला जोडीदारहवा आहे हे सांगताना दिसत आहे. "जेव्हाही मी लग्न करेन किंवा ज्या व्यक्तीशी मी लग्न करेन त्याच्यासमोर मी एकदम कोणतेही फिल्टर न ठेवता वागू शकली पाहिजे', असे ती म्हणाली.
श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'तू झुठी मै मक्कार' चित्रपटात रणबीर कपूरबरोबर तिने स्क्रीन शेअर केली होती. यातील तिची आणि रणबीर कपूरची जोडी खूपच पसंत केली गेली. शिवाय, राजकुमार रावसोबत 'स्त्री २' या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'स्त्री २' ऑगस्ट २०२४ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
श्रद्धाने २०१३ साली 'आशिकी २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. स्टार किड असलेल्या श्रद्धाने अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. 'आशिकी २'नंतर श्रद्धा 'बाघी', 'एक व्हिलन', 'हाफ गर्लफ्रेंड', 'ओके जानू', 'छिछोरे', 'एबीसीडी २' या सुपरहिट चित्रपटांत झळकली आहे.