OMG!! श्रुती हासननं केलं ‘लग्न’, खुद्द बॉयफ्रेन्डनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 10:43 AM2022-03-24T10:43:37+5:302022-03-24T10:44:08+5:30

Shruti Haasan : गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिप स्टेटस लपवून ठेवणाऱ्या श्रुतीने अखेर तिच्या प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे. बॉयफ्रेन्ड शांतनु हजारिकासोबतचं नातं तिने ऑफिशिअल केलं आहे. पण खरी बातमी पुढे आहे...

actress Shruti Haasan's BF Santanu Hazarika opens up on their bond | OMG!! श्रुती हासननं केलं ‘लग्न’, खुद्द बॉयफ्रेन्डनेच केला खुलासा

OMG!! श्रुती हासननं केलं ‘लग्न’, खुद्द बॉयफ्रेन्डनेच केला खुलासा

googlenewsNext

मेगास्टार कमल हासन व अभिनेत्री सारिका यांची लेक श्रुती हासन (Shruti Haasan) सतत चर्चेत असते. सध्या चर्चा आहे ती तिच्या पर्सनल लाईफची. होय, गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिप स्टेटस लपवून ठेवणाऱ्या श्रुतीने अखेर तिच्या प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे. बॉयफ्रेन्ड शांतनु हजारिकासोबतचं ( Santanu Hazarika) नातं तिने ऑफिशिअल केलं आहे. पण खरी बातमी पुढे आहे. यापुढंच सगळं शांतनुने सांगितलं आहे.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शांतनुने एक मोठा खुलासा केला. होय, शांतनु या मुलाखतीत लग्नाबद्दल बोलला. आम्हा दोघांचं लग्न झालंय. अर्थात हे सामान्य, पारंपारिक लग्न नाही तर क्रिएटीव्ह (रचनात्मक) लग्न आहे.  श्रुती आणि मी आम्ही क्रिएटीव्हली विवाहित आहोत. आम्ही दोघंही क्रिएटीव्ह गोष्टी एकत्र करणारे क्रिएटीव्ह लोक आहोत. सामान्यत: लोक लग्न करतात, तसं लग्न कधी होईल, ते आम्हाला ठाऊक नाही. पुढे काय काय होतं, ते बघूच, असं शांतनु म्हणाला. लॉकडाऊन काळात आमचं नातं आणखी प्रगल्भ झालं. आमच्यातील सामंजस्य वाढलं, असंही त्याने सांगितलं.
श्रुती हासन खासगी आयुष्यातील अफेअरमुळे  अनेकदा चर्र्चेत असते. सर्वप्रथम साऊथ स्टार सिद्धार्थसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. हे दोघे काही काळ लिव्ह-इनमध्येही राहिलेत. पण कालांतराने दोघांचे ब्रेकअप झालं.  यानंतर साऊथ अ‍ॅॅक्टर धनुष आणि क्रिकेटर सुरेश रैनासोबतही तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. अर्थात या चर्चा अफवा ठरल्या. शांतनुआधी श्रुती विदेशी अभिनेता मायकल कोर्सेलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लग्न करणार अशाही बातम्या होत्या. पण अचानक दोघांचं ब्रेकअप झालं.

कोण आहे शांतनु?
शांतनु हजारिका दिल्लीचा एक प्रसिद्ध डूडल आर्टिस्ट  आहे. 2014 साली डूडल आर्ट स्पर्धेत त्याने सर्वोत्कृष्ट डूडलचा पुरस्कार जिंकला होता. GAP (गुवाहाटी आर्ट प्रोजेक्ट)चा तो सह-संस्थापक आहे. ईशान्य भारतात एक कला समुदायाची निर्मिती करणे हा या प्रोजेक्टचा उद्देश आहे. रफ्तार, डिवाइन, ऋत्विज अशा म्युझिक इंडस्ट्रीच्या अनेक दिग्गजांसोबत त्याने काम केलं आहे. शांतनुने करिअरसाठी इंजिनिअरिंगचं शिक्षण सांडलं. शांतनु सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.
 

Web Title: actress Shruti Haasan's BF Santanu Hazarika opens up on their bond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.