रेड लाईट एरियात दिसली अभिनेत्री श्वेता बासू, सेक्स स्कँडलमुळे आधीच सापडली होती वादात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 13:52 IST2021-02-05T13:51:17+5:302021-02-05T13:52:22+5:30
सेक्स स्कँडलमध्ये नाव आल्यानंतर पुढची दोन-एक वर्ष श्वेता बासू प्रसादला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले होते. २०१७ मध्ये ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केला होता.

रेड लाईट एरियात दिसली अभिनेत्री श्वेता बासू, सेक्स स्कँडलमुळे आधीच सापडली होती वादात
2002 मध्ये ‘मकडी’ मधून बालकलाकार म्हणून आपल्या सिने कारकीर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद तिच्या फिल्मी करिअरपेक्षा वादग्रस्त कामांमुळेच जास्त चर्चेत राहिली आहे. २०१४ मध्ये श्वेता हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये एका सेक्स स्कँडलमध्ये श्वेता बासू अडकली होती. यामुळे दोन महिने तिला रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले होते. पुढे हैदराबाद सेशन कोर्टने तिला क्लिनचीट दिली होती. या घटनेने श्वेताच्या करिअरवर मोठा परिणाम झाला होता.
सेक्स स्कँडलमध्ये नाव आल्यानंतर पुढची दोन-एक वर्ष श्वेताला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले होते. २०१७ मध्ये ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केला होता. त्यानंतर करिअरमध्ये रुळल्यानंतर श्वेता बॉयफ्रेंड रोहित मित्तलसह लग्नबंधनात अडकली. मात्र तिचे लग्नही फार काळ काही टिकले नाही. लग्नाच्या वर्षभरातच तिने घटस्फोट घेतला.
पुन्हा एकदा श्वेता चर्चेत आली आहे. त्याला कारणीभूत ठरला तिचा हा फोटो. मुंबईतील रेड लाईट परिसरात फिरताना आणि तेथील देहविक्री करणाऱ्या महिलांशी गप्पा मारताना तिला पाहिलं गेलं. समोर आलेल्या माहितीनुसार मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंडिया लॉकडाउन' या सिनेमात ती झळकणार आहे. या सिनेमात देहविक्री करणाऱ्या मुलीची भूमिका ती साकारणार आहे.
ती साकारत असलेल्या भूमिकेला पुरेपूर न्याय मिळावा, ती व्यक्तीरेखा जिवंत आणि हुबेहूब वाटावी याची तयारी म्हणून ती कामाठीपुऱ्यात गेली होती. तिथे फिरण्याचा उद्देश तिथल्या महिलांची बोलण्याची भाषा आणि शैली जाणून घेणे हा होता. मला माझ्या बोलण्यातील लकब बदलण्याची गरज आहे असे तिने सांगितले.
तसेच आत्तापर्यंत या विषयावर आलेले सिनेमे 'चांदणी बार', करिना कपूरचा 'चमेली' आणि कोंकणा सेनशर्माचा 'ट्रॅफिक सिग्नल' अभ्यासाचा भाग म्हणून अनेकवेळा पाहिले असल्याचेही तिने सांगितले. इतके महिने लॉकडाऊमध्ये राहिल्यानंतर या वर्षी श्वेताचे जवळजवळ पाच प्रोजेक्ट रिलीज होणार आहेत.