सेक्स रॅकेटमध्ये फसली होती ही अभिनेत्री, लग्न करून वर्षभरातच घेतला घटस्फोट, आता जगतेय असे आयुष्य !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 13:10 IST2020-04-14T13:06:58+5:302020-04-14T13:10:41+5:30
२०१४ मध्ये हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये एका सेक्स स्कँडलमध्ये श्वेता बासू अडकली होती.

सेक्स रॅकेटमध्ये फसली होती ही अभिनेत्री, लग्न करून वर्षभरातच घेतला घटस्फोट, आता जगतेय असे आयुष्य !
'कहानी घर घर की' या मालिकेत श्वेता बासूने बालकलाकाराची भूमिका बजावली होती. त्याच्यानंतर ती 'मकडी' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. त्यानंतर तिची 'चंद्र नंदिनी' ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे श्वेता अक्टिंग करिअरपेक्षा ती खासगी आयुष्यच वादग्रस्त राहिले. उत्तम अभिनयक्षमता असूनही केवळ एका घटननेने तिचे संपूर्ण करिअरलाच पूर्णविराम लागला.
२०१४ मध्ये हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये एका सेक्स स्कँडलमध्ये श्वेता बासू अडकली होती. यामुळे दोन महिने तिला रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले होते. पुढे हैदराबाद सेशन कोर्टाने तिला क्लिनचीट दिली होती. या घटनेने श्वेताच्या करिअरवर मोठा परिणाम झाला होता. सेक्स स्कँडलमध्ये नाव आल्यानंतर पुढची दोन-एक वर्ष श्वेताना बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले होते.
२०१७ मध्ये 'बद्रीनाथ की दुल्हनियाँ'या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले होते. त्यानंतर करिअरमध्ये रुळल्यानंतर श्वेता बॉयफ्रेंड रोहित मित्तलसह लग्नबंधनाथ अडकली. श्वेता ही बंगाली असून रोहित हा मारवाडी असल्यामुळे दोन्ही पद्धतीने ते लग्न पार पडले होते.
सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच श्वेताच्या आयुष्यात पुन्हा एकद वादळ आले. तिचे वैवाहिक आयुष्याची गाडी रूळावर येण्याआधीच घसरली. केवळ वर्षाभरातच या दोघांमध्ये खटके उडत असल्या कारणाने दोघांनी घटस्फोट घेतला.
लग्नानंतर आता श्वेतावर कसलीही जबाबादारी नाही. त्यामुळे स्वच्छंदी तिचे आयुष्य ती जगत आहे. तिच्या आयुष्याचा मस्त आनंद ती घेत आहे. श्वेताच्या इन्स्टापेजवर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला तिच्या लाईफस्टाइलचा अंदाज येईल.
बोल्ड आणि बिनधास्त असणारी श्वेताचा प्रत्येक अंदाज हा घायाळ करणारा असाच असतो. श्वेता सोशल मीडियावर एक्टीव्ह असून ती त्यामाध्यमातून चाहत्यांसह कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते.