स्मिता पाटीलचा मुलगा करतोय लग्न, पण घरच्यांनाच नाही निमंत्रण! काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:24 IST2025-02-14T15:21:01+5:302025-02-14T15:24:21+5:30

स्मिता पाटीलचा लेक प्रतीक बब्बर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. पण अभिनेत्याने कुटुंबियांना लग्नाचं आमंत्रण दिलं नाहीये कारण...

actress Smita Patil son pratik babbar wedding with actress priya banerjee | स्मिता पाटीलचा मुलगा करतोय लग्न, पण घरच्यांनाच नाही निमंत्रण! काय आहे कारण?

स्मिता पाटीलचा मुलगा करतोय लग्न, पण घरच्यांनाच नाही निमंत्रण! काय आहे कारण?

स्मिता पाटील (smita patil) या भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. स्मिता पाटीलचा लेकप्रतीक बब्बर (pratik babbar) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. प्रतीकचा स्वतःचा चाहतावर्ग आहे. प्रतीक आज व्हॅलेंटाईन डेच्या (valentine day) मुहुर्तावर लग्नबंधनात अडकणार आहे. पण प्रतीकने लग्नाला त्याच्या कुटुंबियांनाच आमंत्रण दिलं नाही अशी चर्चा आहे. प्रतीकचा भाऊ आर्य बब्बरने याविषयी खुलासा केलाय. याशिवाय कुटुंबात असलेल्या मतभेदांबद्दलही सांगितलंय.

प्रतीकने लग्नाला कुटुंबियांनाच नाही बोलावलं

गेल्या काही महिन्यांपासून स्मिता पाटीलचा लेक प्रतीकचे त्याच्या कुटुंबियांसोबत चांगले संबंध नाहीत. प्रतीकने त्याच्या कुटुंबियांना दूर केलंय, त्यामुळे सर्वांनाच या गोष्टीचा खूप त्रास होतोय, असा खुलासा आर्य बब्बरने केला. कुटुंबाने प्रतीकसोबतचे बिघडलेले नातेसंबंध चांगले व्हावेत यासाठी खूप प्रयत्न केले. आर्य म्हणाला की, "सध्याच्या काळात व्हर्च्युअल जगात मी सुद्धा प्रतीकला ऑनलाईन शुभेच्छा देण्याचा निर्णय घेतला. मी युट्यूबवर सर्व कुटुंबियांना एकत्र आणून 'बब्बर तो शादी करते रहते है' हा व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून प्रतीकपर्यंत आमच्या शुभेच्छा पोहोचतील आणि त्याचं मन बदलेल अशी अपेक्षा आहे. काहीही झालं तरी आमचं कुटुंब एकत्र असेल."


प्रतीक दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

प्रतीक बब्बरने २०२३ मध्ये त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीला प्रपोज केलं होतं. त्यांनी काही महिन्यांपूर्वी साखरपुडाही केला होता. याआधी प्रतीक सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकला होता. मात्र ४ वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. प्रिया बॅनर्जी ही कॅनेडियन अभिनेत्री आहे. हिंदी, तेलुगु आणि तमिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने काही वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. प्रतीक आणि प्रिया आज व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर लग्नबंधनात अडकणार आहे.  

Web Title: actress Smita Patil son pratik babbar wedding with actress priya banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.