हे एका दृष्टाचं काम..., ‘वॉरंट’च्या बातम्यांवर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 01:26 PM2022-03-08T13:26:54+5:302022-03-08T13:27:15+5:30

Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या एका कायदेशीर प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर सोनाक्षीने एक स्टेटमेंट जारी केलं आहे.

actress sonakshi sinha issues an official statement on the non bailable warrant-rumours | हे एका दृष्टाचं काम..., ‘वॉरंट’च्या बातम्यांवर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन

हे एका दृष्टाचं काम..., ‘वॉरंट’च्या बातम्यांवर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन

googlenewsNext

Sonakshi Sinha Answer On Non-bailable Warrant : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)सध्या एका कायदेशीर प्रकरणामुळे चर्चेत आहे. एका फसवणुकीच्या प्रकरणात सोनाक्षीविरोधात अजमानती वॉरंट जारी झाल्याच्या बातम्या येत आहेत. दिल्लीत आयोजित एका इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी सोनाक्षीला 37 लाख रूपये दिले गेले होते. पण ती इव्हेंटला पोहोचलीच नाही आणि यानंतर तिने पैसे परत करण्यासही नकार दिला, असा आरोप सोनाक्षीवर आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर सोनाक्षीने एक स्टेटमेंट जारी केलं आहे. वॉरंटजारी झाल्याच्या सर्व बातम्या निराधार व अफवा असल्याचं सोनाक्षीने यात म्हटलं आहे.

मंगळवारी तिने स्टेटमेंट जारी केलं. यात ती म्हणते, ‘माझ्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्याच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमात उमटत आहेत. या सगळ्या काल्पनिक बातम्या आहे. हे एका दृष्ट व्यक्तिचं काम आहे. जी मला त्रास देण्याचा प्रयत्न करतेय. मी सर्व पत्रकार व मीडियाला विनंती करते की, अशा खोट्या बातम्या त्यांनी प्रसिद्ध करू नयेत. माझ्याविरोधात अफवा पसरवणारी व्यक्ति केवळ पब्लिसिटीसाठी हे सगळं करतोय. तो माणूस पब्लिसिटीसाठी मला बदनाम करतोय आणि मीडिया खोट्या बातम्या छापून मी अथक कष्टानं मिळवलेली प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहे. हे प्रकरण मुरादाबाद कोर्टात विचाराधीन आहे आणि अलाहाबाद कोर्टाने या प्रकरणावर स्थगिती आणली आहे. तूर्तास माझ्याविरोधात कोणताही वॉरंट जारी झालेला नाही.’

काय आहे प्रकरण
 आरोपानुसार,उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील शिवपुरी कॉलनी येथील रहिवासी इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्मा यांनी 30 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीच्या श्री फोर्ट ऑडिटोरियममध्ये इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्डचे आयोजन केले होते. यामध्ये सोनाक्षी सिन्हा ठरलेल्या तारखेला पोहोचली नाही.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रमोद शर्मा यांनी टॅलेंट फुलऑन आणि एक्साइड एंटरटेनमेंट कंपनीच्या माध्यमातून प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्याशी करार केला होता. यासाठी सोनाक्षीने एक प्रमोशनल व्हिडिओही जारी केला आहे. कार्यक्रमाला येण्यासाठी सोनाक्षी सिन्हाने 29.92 लाख रुपये वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये घेतले. मात्र, ती या कार्यक्रमाला पोहोचली नाही, असा आरोप आहे.

Web Title: actress sonakshi sinha issues an official statement on the non bailable warrant-rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.