नवव्या महिन्यात गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले तूप खात आहे अभिनेत्री, सांगितले फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 03:42 PM2024-11-11T15:42:00+5:302024-11-11T15:43:02+5:30

सोनाली ही गर्भवती असून लवकरच बाळाला जन्म देणार आहे.

Actress Sonnalli Seygall Shares Pregnancy Diet Secret | Ghee Made From Cow Urine | नवव्या महिन्यात गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले तूप खात आहे अभिनेत्री, सांगितले फायदे

नवव्या महिन्यात गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले तूप खात आहे अभिनेत्री, सांगितले फायदे

Sonnalli Seygall Pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली सहगल 'प्यार का पंचनामा 2'मधून लाईमलाईटमध्ये आली. सध्या ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाली ही गर्भवती असून लवकरच बाळाला जन्म देणार आहे. विशेष म्हणचे हा तिचा शेवटचा नववा महिना सुरू आहे. सोनाली नवव्या महिन्यात गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले तूप खात आहे. याचा खुलासा खुद्द तिनेच केलाय. शिवाय याचे फायदेही तिने सांगितले आहेत. 

सोनाली सहगलने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्या हातात पंचगव्य तुपाचा डबा दिसतोय. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण यांचे मिश्रण. यासोबत सोनालीने लिहिलं, "हे टेस्टमध्ये चांगले नाही. पण त्याचे अनेक फायदे आहेत". 

यासोबत आणखी एका पोस्टमध्ये पंचगव्य तुपाचे फायदे सांगत तिने लिहलं, याचे सेवन केल्याने मानसिक व शारीरिक शक्ती चांगली राहते. यामुळे हृदयाशी संबंधित आजारही दूर होतात. सोनाली सहगलने 16 ऑगस्ट रोजी तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. एका अतिशय क्यूट पोस्टद्वारे तिने सांगितले होते की ती आई होणार आहे.


 
सोनाली सहगलच्या पतीचे नाव आहे आशेष सजनानी या दोघांनी जून 2023 मध्ये लग्न केले. आशिष हा बिझनेसमन आहे, त्याची बरीच हॉटेल्स आहेत. बराच काळ डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. सोनाली गेल्या 12 वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. मात्र, तिला आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकलेले नाही. 2011 मध्ये तिने 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर ती 'वेडिंग पुलाव', 'प्यार का पंचनामा 2', 'जय मम्मी दी' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

Web Title: Actress Sonnalli Seygall Shares Pregnancy Diet Secret | Ghee Made From Cow Urine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.