साउथच्या ‘या’ सुपरस्टारची ही अभिनेत्री आहे जबरदस्त फॅन; बोलण्यात, चालण्यात अन् नाचण्यातही बघायला मिळते त्याची झलक!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 02:29 PM2018-03-29T14:29:29+5:302018-03-29T19:59:29+5:30
साउथच्या या सुपरस्टारची ‘ही’ अभिनेत्री जबरदस्त फॅन आहे. तिच्या बोलण्यात चालण्यात अन् नाचण्यातही त्याची झलक बघावयास मिळते.
ब लिवूडचा किंग शाहरूख खानच्या २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फॅन’ या चित्रपटात सुपरस्टार प्रती चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ यामध्ये दाखविण्यात आली. शाहरूखचा हा फॅन काहीसा उपद्रवी होता. परंतु आज आम्ही तुम्हाला एका चांगल्या चाहत्याची स्टोरी सांगणार आहोत. मल्याळम चित्रपटातील सुपरस्टार मोहनलालच्या चाहत्यावर एका चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटाचे नाव ‘मोहनलाल’ असे आहे. चित्रपटात मोहनलालची एक अशी चाहती दाखविण्यात आली आहे, जी त्याच्या अंदाजावर बोलते, चालते अन् डान्सही करते. चित्रपटाचा टीजर नुकताच समोर आला असून, त्यास प्रेक्षकांकडून प्रचंड पसंत केले जात आहे.
‘मोहनलाल’च्या चाहत्याच्या भूमिकेत मंजू वारियर दिसत आहे. चित्रपटात ती मीनूकुट्टी नावाची भूमिका साकारत असून, ती मोहनलाल यांची जबरदस्त फॅन असल्याचे दाखविण्यात आले आहे. मीनूकुट्टीचा जन्म त्याच दिवशी झाला, ज्यादिवशी मोहनलालचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक साजिद याहिया हे आहेत. चित्रपट विशुनिमित्त प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, मंजू वारियरने वयाच्या १६व्या वर्षी ‘साक्ष्यम’ या मल्याळम चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मंजूला तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. मंजूने १९९८ मध्ये अभिनेता दिलीपबरोबर लग्न केले होते. लग्नानंतर तिने आपल्या फिल्मी करिअरमधून ब्रेक घेतला. पुढे २०१५ मध्ये तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने ‘हाउ ओल्ड आर यू’या चित्रपटातून कमबॅक केले. असो, ‘मोहनलाल’मधील भूमिकेत ती जबरदस्त दिसत असून, चाहत्यांना तिचा अंदाज चांगलाच भावत असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट पूर्णत: पॉझिटिव्ह असल्याचे बोलले जात आहे.